...तर लाडक्या बहिणी तुम्हाला घरी बसवतील !
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना इशारा
नागपूर, प्रतिनिधी :
‘लाडकी बहीण योजनेवर बोलून तुम्ही बोलू नये. या योजनेला तुम्ही विरोध केला म्हणूनच विधानसभा निवडणुकीत तुमचा पराभव झाला. आता आणखी तुम्ही या योजनेला विरोधच करत असाल तर भविष्यातही लाडक्या बहिणी तुम्हाला घरी बसवतील, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत विरोधकांना दिला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 ऊपयांची आर्थिक मदत केली जाते. सध्या पात्र महिलांकडून केवायसीची प्रक्रिया करून घेतली जात आहे. या प्रक्रियेदरम्यान महिलांना अनेक अडचणी येत आहेत. दुसरीकडे नियमांचे उल्लंघन करून लाभ घेण़ार्या अनेक लाडक्या बहिणींची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहे. या सर्व मुद्यांवर आज राज्य विधिमंडळात मोठी खडाजंगी झाली.
विरोधकांनी या योजनेत मोठा घोळ झाल्याचा गंभीर आरोप केला. महिलांना 2100 ऊपयांची वाढीव मदत कधी देणार, असे विचारले. नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करून तुम्ही सेविका, ग्रामसेवक यांना अमुक अमुक फॉर्म भरण्याचे टार्गेट दिले. त्यानंतर या कर्मच़ार्यांनी अनेक ठिकाणी बोगस फॉर्म भरले आहेत. या योजनेत मोठी गडबड झालेली आहे. या गडबडीला कोण जबाबदार आहे. या योजनेसाठी वापरण्यात आलेले पैसे हे सरकारवर बसलेल्यांचे नाहीत. सत्तेत बसलेले मालक नाहीत. जनतेच्या पैशांचा हिशोब द्यावा लागेल, असा थेट जाब काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विचारला.
पोर्टल उपलब्ध करून दिले आहे : मंत्री आदित्य तटकरे
विरोधकांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांना महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर दिले. लाडक्या बहिणींना नावनोंदणी करण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले होते. तसेच ऑफलाईन पद्धतीनेही नावनोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे कोणताही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन आदिती तटकरे यांनी केले. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाना पटोले यांना लक्ष्य करून तुम्ही लाडकी बहीण योजनेवर बोलून नये. या योजनेला तुम्ही विरोध केला होता. तुम्ही योजनेला विरोध केला म्हणूनच विधानसभा निवडणुकीत तुमचा पराभव झाला. आता आणखी तुम्ही या योजनेला विरोधच करत असाल तर भविष्यातही लाडक्या बहिणी तुम्हाला घरी बसवतील, असा हल्लाबोल केला. योग्य वेळ आली की आम्ही लाडक्या बहिणींना 2100 ऊपयांचा लाभही देऊ, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी सभागफहात केली.
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही
लाडकी बहीण योजना ही सरकारची लोकाभिमुख आणि जनकल्याणकारी योजना असून ती कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. योजना सुरू करताना आम्ही सकारात्मक भावनेने निर्णय घेतला, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.