For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli : ...अन्यथा 11 नोव्हेंबरपासून तीव्र आंदोलन करण्यात येईल; राजू शेट्टींचा कारखानदाऱ्यांना इशारा

03:37 PM Oct 17, 2025 IST | NEETA POTDAR
sangli      अन्यथा 11 नोव्हेंबरपासून तीव्र आंदोलन करण्यात येईल  राजू शेट्टींचा कारखानदाऱ्यांना इशारा
Advertisement

                 विनाकपात, एकरकमी ३७५१ रूपये मिळावेत : राजू शेट्टी

Advertisement

जयसिंगपूर: चालू गळीत हंगामातील तुटणाऱ्या उसाला प्रतिटन ३७५१ रूपये विनाकपात पहिली उचल मिळावी, कारखानदारांनी १० नोव्हेंबर पर्यंत घोषणा न केल्यास ११ नोव्हेंबर पासून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. गतं हंगामातील उसाला प्रतिटन एफआरपी अधिक २०० रूपये मिळाल्याशिवाय कारखानदारांना सोडणार नाही, असेही त्यांनी बजावले,

त्याचबरोबर रिकव्हरी चोरी, एकरकमी एफआरपी विरोधात कारखानदारांची भूमिका, काटामारी याबाबत कारखानदारावर टीकास्त्र सोडले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जयसिंगपूर येथे गुरुवारा २४ वी ऊस परिषद पार पडली. संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते हसन मुरसल अध्यक्षस्थानी होते. परिषदेसाठी मराठवाडासह, महाराष्ट्र, कर्नाटकातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

शेट्टी यांनी २४ वर्षांपूर्वी आंदोलनाची सुरुवात कशा पद्धतीने झाली याचा इतिहास सांगितला. ते म्हणाले, २४ वर्षांपूर्वी कारखानदार उसाचे दर ठरवत होते परंतु स्वाभिमानीने शेतकरी परिषद घेण्यास सुरुवात केली आणि याच परिषदेत दर ठरू लागला. एफआरपीचे तुकडे करण्यासाठी कारखानदार व राज्य शासन प्रयत्न करीत आहे. एकरकमीसाठी कारखानदार आपल्या व्याजदराचा मुद्दा उपस्थित करतात. वास्तविक नाबार्डकडून कर्ज न घेता जिल्हा बँक आणि राज्य बँकेकडून पैसे घेऊन कारखानदार अशा बँकेचे भले करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. आंदोलन करण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या पहिल्या उचलमधून त्यांनी घेतलेले कर्ज फिटतच नव्हते. किमान पहिल्या उचल मधून शेतकऱ्यांचे कर्ज फिटावे, यासाठीच आम्ही पहिल्या उचलची रक्कम अधिक मागत आहोत. त्यातून शेतकऱ्यांचा मोठा फायदा होत आहे.

सलग चार महिने पडलेल्या पावसामुळे यंदा उसाचे उत्पादन कमी असल्याने शेतकऱ्यांनी ऊस तोडायला गडबड करू नये. एक रकमी एफआरपीसाठी आम्ही लढत आहोत. न्यायालयात ही आम्ही लढाई जिंकली आहे. आता ते सर्वोच न्यायलयात गेले आहेत. ती ही आम्ही जिंकू.

ऊसमाफियांचा नवा वर्ग

वाहतूक खर्चाच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांची लूट सुरू आहे २५ किलोमीटर परिघात ऊस असणाऱ्या शेतकऱ्यांची तोडणी वाहतूक प्रतिटन ७५० रूपये होत असताना ९०० ते ११०० रुपये वसूल करून प्रतिटन ३५० रूपये लुटले जात आहेत. ऊस माफियांचा नवा वर्ग तयार झाला आहे. आज साखरेचा भाव ४,००० ते ४,१०० रूपये क्विंटल आहे. उसाचा भाव ३,००० रुपयेअसेल, तर हा १,१०० चा जो फरक आहे, हीच खरी लूट आहे. आणि ह्या लुटीचं रहस्य काय असेल तर कारखानदार आणि सरकारचे. संगनमत. ही लूट आपल्याला परत आणायची आहे, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.

सत्ताधारी नेत्यांनी जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करून हमीभावाप्रमाणे दर मिळावा, एआय तंत्रज्ञानाचा वापर रिकवरी व वजन यासाठीही करावा, अशा मागण्याही त्यांनी केल्या. यावेळी पुरंदर पाटील, राजेंद्र गड्यानवर, प्रकाश पोफळे, सुर्यभान जाधव, अजित पवार, सूर्यभान जाधव आदी पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. स्वागत शिरूर तालुका अध्यक्ष तानाजी वाघमारे यांनी केले तर प्रास्ताविक विठ्ठलराव मोरे यांनी केले.

प्रत्येक कारखान्यात काटामारी

आज प्रत्येक कारखान्यावर सरासरी सात ते दहा टक्के काटा मारला जातो. ५ हजार दैनंदिन क्षमता असलेल्या कारखान्यात काटामारीमधून दररोज १५ लाख रुपये लुटले जातात. १५ हजार क्षमता असलेल्या कारखान्यातून एका वर्षात पुन्हा नवीन कारखाना उभा राहील एवढी रक्कम फक्त या काटामारीमधूनच लुटली जात आहे. शासनाने जर ठोस पावले उचलली तर ही लूट नक्कीच थांबेल. ज्याप्रमाणे पेट्रोल डिझेल कंपनीनी ग्राहकांची लूट होऊ नये यासाठी जी दक्षता घेतली ती दक्षता साखर कारखान्याबाबत ही घेतल्यास नक्कीच शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, असेही शेट्टी म्हणाले.

Advertisement
Tags :

.