For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अन्यथा मांसविक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई

11:07 AM Oct 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
अन्यथा मांसविक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई
Advertisement

मनपाचा इशारा : भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणाचा प्रयत्न

Advertisement

बेळगाव : शहरातील मांसविक्री दुकानदारांकडून मांस व्यवस्थितरित्या गोळा आणि वाहतूक केले जात नाही. रक्त, हाडे आणि मांसाचे अवशेष रस्त्याच्या कडेला व उघड्यावर टाकले जात असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. यामुळेच भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. इतकेच नव्हेतर नागरिकांवरील कुत्र्यांचे हल्ले वाढले असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मांसविक्री दुकानदारांना काही नियम घालून देण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी, गटारींमध्ये किंवा मोकळ्या जागेत मांसाचा कचरा, रक्त किंवा अवशेष फेकण्यास सक्त मनाई आहे.

सदर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर केएमसी कायदा 978 आणि घनकचरा व्यवस्थापन नियम 208 अंतर्गत कारवाई केली जाईल. सर्व प्रकारचा मांस कचरा योग्यरित्या गोळा केला पाहिजे. तसेच तो महापालिकेच्या कचरा गोळा करणाऱ्यांकडे सुपूर्द केला पाहिजे. तसेच त्याची व्यवस्थितरित्या विल्हेवाट लावली पाहिजे. मांस वाहतूक करण्यासाठी बंद, गळती प्रतिरोधक वाहने वापरावीत, मांसाच्या वासाने भटक्या कुत्र्यांना आकर्षित करणारी कोणतीही व्यवस्था नसावी, नियमांचे उल्लंघन केल्यास सदर दुकानाचा परवाना रद्द करून दंडात्मक कारवाई केली जाईल, जर नागरिकांना कोठेही अनधिकृतपणे मांस कचरा टाकल्याचे किंवा मांस वाहतूक होत असल्याचे दिसून आल्यास ताबडतोब त्याची महापालिकेला लेखी माहिती कळवावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.