कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ओसुलीव्हानच्या जेतेपदाचे स्वप्न अधुरे

06:22 AM May 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / शेफिल्ड (ब्रिटन)

Advertisement

येथे सुरू असलेल्या विश्व स्नूकर चॅम्पियनशिप स्पर्धेत आतापर्यंत सातवेळा अजिंक्यपद मिळविणारा रोनी ओसुलीव्हानचे विक्रमी आठव्यांदा जेतेपद मिळविण्याचे स्वप्न चीनच्या झाओ झीनटाँगने संपुष्टात आणले.

Advertisement

या स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या लढतीत चीनच्या झीनटाँगने 49 वर्षीय ब्रिटनच्या ओसुलीव्हानचा 17-7 अशा फ्रेंम्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. आता या स्पधेंतील अंतिम सामना 33 प्रेम्समध्ये खेळविला जाणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासात अंतिम फेरी गाठणारा झीनटाँग हा आशियातील दुसरा स्नुकरपटू आहे. यापूर्वी म्हणजेच 2016 साली चीनच्या डींग जुनहुई याने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता पण त्याला मार्क सेलबायकडून हार पत्करावी लागली हाती.

शेफील्डमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या उपांत्य लढतीत टॉपसिडेड आणि 2019 साली या स्पर्धेचे जेतेपद मिळविणारा जूड ट्रम्पला मार्क विलियम्सने 8-8 असे बरोबरीत रोखले. स्कॉटलंडचा जॉन हिगीन्स आणि ग्रीन डॉट यांनी अनुक्रमे 1998 आणि 2006 साली या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. चीनच्या झाओ झीनटाँग याच्यावर यापूर्वी मॅचफिक्सींग प्रकरणात दोषी ठरल्याने 20 महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. पण त्याच्या बंदीचा कालावधी गेल्या वर्षी संपुष्टात आला असून आता तो ही स्पर्धा जिंकणारा पहिला चीनचा स्नूकरपटू ठरु शकेल.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article