ठाकरेंच्या खासदाराने भाजपच्या आमदाराची औकात काढली?, वाचा काय घडलं उस्मानाबादेत
usmanabadnews- पिकविम्यावरून उस्मानाबादमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भाजपचे आमदार जगजित सिंग राणा पाटील यांची औकात काढल्याचा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या दोघांच्यामध्ये टोकाची हमरीतुमरी झाली असे सांगण्यात येत आहे . पिकविम्याच्या मुद्द्यावरून उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातच दोघांची शाब्दिक चकमक झाली. जास्त बोलू नकोस, तू तूझ्या औकातीत राहा अशी धमकी खासदार ओम राजे यांनी आमदार राणा यांना दिली. असे व्हिडिओतून दिसत आहे.
तुझे संस्कार तुझी औकात मला ठाऊक आहे, अशा शब्दात ओमराजे निंबाळकर यांनी आमदार राणा पाटील यांना सुनावलं आहे. ठाकरे गटाचे खासदार आणि भाजप आमदार यांच्यातील शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
वाद कशामुळे झाला?
प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत खरीप 2022 मधील पीक नुकसानीच्या 254 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेत. मात्र नुकसान भरपाईच्या रकमेतील तफावतीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त होत्या. त्याचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने आज सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली होती. लोकप्रतिनिधींना बोलवण्यावरून शिवसेना ठाकरे गट खासदार ओमराजे निंबाळकर व भाजप आमदार राणाजगदीतसिंह पाटील यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्यासमोर शाब्दिक चकमक झाली.