ऑस्कर पुरस्कार सोहळा आज रंगणार
वृत्तसंस्था/ लॉस एंजेलिस
जगभरातील सिनेप्रेमी ऑस्करची आतुरतेने वाट पाहत असतात. आता ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार सोहळा लॉस एंजेलिस येथे होणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार 11 मार्च रोजी पहाटे 4:00 वाजता ‘ऑस्कर उत्सव’ सुरू होईल. 96 व्या अकादमी पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा ओव्हेशन हॉलीवूडच्या डॉल्बी थिएटरमध्ये आयोजित समारंभात केली जाईल. अॅपॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसतर्फे विविध श्रेणीतील विजेत्यांना ऑस्कर ट्रॉफी प्रदान करण्यात येणार आहे. आशियामध्ये हा पुरस्कार शो ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी-हॉटस्टार वर थेट प्रसारित होणार आहे. 23 जानेवारी रोजी ऑस्कर पुरस्कार 2024 साठी नामांकने जाहीर करण्यात आली. 96 व्या अकादमी पुरस्कार नामांकनांमध्ये ओपेनहायमर, बार्बी, पुअर थिंग्ज, किलर्स ऑफ द फ्लॉवर मून आणि मेस्ट्रो यांचे वर्चस्व होते.