For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओसाका, व्होंड्रोसोव्हा, अँडी मरे पराभूत

06:19 AM Jan 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
ओसाका  व्होंड्रोसोव्हा  अँडी मरे पराभूत
Advertisement

वृत्तसंस्था/ मेलबर्न

Advertisement

2024 च्या टेनिस हंगामातील येथे रविवारपासून सुरू झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पहिलांच्या विभागात अमेरिकेच्या कोको गॉफने विजयी सलामी दिली. मात्र जपानची नाओमी ओसाका तसेच विम्बल्डन विजेती व्होंड्रोसोव्हा यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. साबालेंकाने दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. पुरूष विभागात ब्रिटनच्या अँडी मरेचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.

महिला एकेरीच्या सोमवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या फेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफने अॅना कॅरोलिना स्किमेडिलोव्हाचा 6-3, 6-0 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत विजयी सलामी दिली. गेल्या सप्टेंबरमध्ये 19 वर्षीय गॉफने अमेरिकन खुली ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती. अन्य एका सामन्यात विम्बलडन विजेती मर्केटा व्होंड्रोसोव्हाचे आव्हान पहिल्याच फेरीत डायना यास्त्रीम्स्काकडून संपुष्टात आले. यास्त्रीम्स्काने व्होंड्रोसोव्हाचा 6-1, 6-2 असा एकतर्फी पराभव करत दुसरी फेरी गाठली. जपानच्या नाओमी ओसाकाचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. फ्रान्सच्या 16 व्या मानांकित कॅरोलिन गार्सियाने नाओमी ओसाकाचा 6-4, 7-6 (7-2) असा पराभव करत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. ओसाकाने आतापर्यंत 4 ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या असून 2022 च्या सप्टेंबरपासून ती टेनिस क्षेत्रापासून अलिप्त होती. ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम विजेती साबालेंकाने जर्मनीच्या इला सिडेलचा 6-0, 6-1 असा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

Advertisement

पुरूषांच्या विभागात ब्रिटनच्या माजी टॉप सिडेड अँडी मरेचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. सोमवारी झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाच्या टॉमस मार्टीन इचेलव्हेरीने अँडी मरेचा 6-4, 6-2, 6-2 अशा सेट्समध्ये पराभव केला. पुरूष विभागातील रशियाच्या तृतीय मानांकित मेदवेदेवने दुसऱ्या फेरीत प्रेवश मिळविला आहे. त्याचा या सामन्यातील प्रतिस्पर्धी टेरेन्स अलमेनीने दुखापतीमुळे तिसरा सेट सुरु असताना माघार घेतली. मेदवेदेवने हा सामना 5-7, 6-2, 6-4, 1-0 असा जिंकत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. ग्रीसच्या सित्सिपसने बर्गचा 5-7, 6-1, 6-1, 6-3, अॅड्रीयन मॅनेरिनोने स्वीसच्या वावरिंकाचे आव्हान संपुष्टात आणले. शेल्टनने बॉटीस्टा अॅग्युटचा 6-2, 7-6 (7-2), 7-5, अमेरिकेच्या कोद्राने कोप्रिव्हाचा 6-1, 6-4, 2-6, 4-6, 6-2, असा पराभव केला. फ्रान्सच्या मोनफिल्सने हेनफनवर 6-4, 6-3, 7-5, असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.

Advertisement
Tags :

.