कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Organ Donation : साडेतीन तासात अवयव पोहोचले पुण्यात, मिरजेतील रुग्णालयाचे यश

01:24 PM Jun 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

स्थानिक प्रशासन आणि सेवासदनच्या वैद्यकीय टीमने कामगिरी केली

Advertisement

मिरज : अवयवदानाचा संकल्प केलेल्या 75 वर्षीय रुग्णाचे डोळे व यकृत केवळ साडेतीन तासात पुण्यात पोहोचवून दुसऱ्या रुग्णाला जीवदान देण्यात सेवासदन लाईफलाईन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलला यश आले. स्थानिक प्रशासन आणि सेवासदनच्या वैद्यकीय टीमने बुधवारी ही कामगिरी करुन दाखवली.

Advertisement

नातेवाईकांच्या सहमतीनंतर जिल्हाधिकाऱ्यांपासून जिल्हा पोलीस प्रमुखांनी सर्वतोपरी मदत करुन तातडीने अवयव पुण्यात पोहोचविण्यासाठी योगदान दिले. विशेष म्हणजे पहाटेच्या सुमारास ही प्रक्रिया झाली अन् वेगवान पध्दतीने मानवाचे जीवंत अवयव पुण्याच्या सह्याद्री रुग्णालयापर्यंत सुरक्षित पोहोचले.

सांगली-मिरज रस्त्यावरील सेवासदन लाईफलाईन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एक 75 वर्षीय ऊग्ण दाखल होता. जीवंतपणी सदर रुग्णाने अवयवदानाची इच्छा व्यक्त केली होती. सदर रुग्णाच्या अवयवदानाबाबत नातेवाईकांना मािहती दिली. नातेवाईकांनीही अवयव दान करण्यासासाठी सहमती दिली.

त्याचवेळी पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाला यकृत आणि डोळ्यांची आवश्यकता होती. त्यामुळे सेवासदनमध्ये असलेल्या रुग्णाचे डोळे व यकृत असे दोन्ही अवयव ग्रीन कॉरिडॉरद्वारे पुण्यापर्यंत पोहचविण्याचा निर्णय घेण्यात आला.

बुधवारी पहाटे सेवासदन येथे यशस्वीरीत्या ग्रीन कॉरिडॉर राबवला. या महत्त्वपूर्ण आणि जीवनदायी उपक्रमामध्ये न्यूरोलॉजिस्ट डॉ. केतकी पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली आयसीयू टीम, ऑपरेशन थिएटर टीम, व भूलतज्ञ डॉ. दर्शना पांडे यांनी महत्त्वाची भुमिका बजावली. या सर्व वैद्यकीय तज्ञांच्या अचूक आणि वेगवान समन्वयामुळे हे कार्य तांत्रिकदृष्ट्या यशस्वी झाले.

मोहिमेला आवश्यक प्रशासकीय पाठबळ देखील मिळाले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी वेळेवर आवश्यक परवानग्या, सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रणाची मदत केली. त्यांच्या सहकार्यामुळे संपूर्ण ग्रीन कॉरिडॉर ऑपरेशन निर्विघ्न आणि वेळेत पार पडले. त्यानंतर सेवासदन हॉस्पिटलने प्रशासनाचे आभार मानले.

वैद्यकीय सेवेचा मानवतावादी संदेश

"‘अवयव दान’ आणि ‘ग्रीन कॉरिडॉर’ बाबत समाजात जागरूकता वाढत आहे. अवयवदानातून गरजू रुग्णांना नवीन जीवन मिळते. सेवासदन हॉस्पिटल नेहमीच अशा जीवनरक्षक, सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन आरोग्यसेवा क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्यासोबत समाजात मानवतावादी संदेश पोहचविण्यासाठी कटीबद्ध आहे."

- डॉ. रविकांत पाटील, संचालक-सेवासदन हॉस्पिटल

Advertisement
Tags :
#mirajsangli news
Next Article