For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शतक महोत्सवी हॉकी दौऱ्याचे आयोजन

06:04 AM Apr 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
शतक महोत्सवी हॉकी दौऱ्याचे आयोजन
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

न्यूझीलंड हॉकी संघटनेने भारताच्या शतक महोत्सवी हॉकी दौऱ्याचे आयोजन मोठ्या प्रमाणात साजरे करण्याची योजना आखली आहे. 1926 साली भारताचे हॉकी जादुगार दिवंगत ध्यानचंद यांचा सहभाग असलेला भारतीय सेनादल हॉकी संघाने पहिल्यांदा न्यूझीलंडचा दौरा केला होता. या दौऱ्याला आता 100 वर्षे पूर्ण होणार असून शतक महोत्सवी कार्यक्रम आयोजित करण्याची योजना न्यूझीलंडच्या शासनातर्फे आखण्यात आली आहे.

या दौऱ्यानंतरच भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील क्रीडा संबंध अधिक दृढ होत गेल्याची माहिती भारतातील न्यूझीलंडचे उच्चायुक्त डेव्हिड पाईन यांनी दिली आहे. 1926 साली भारतीय सेनादल हॉकी संघाने केलेला न्यूझीलंडचा दौरा हा ऐतिहासिक ठरला आहे. आता 2026 साली शतक महोत्सवी योजना न्यूझीलंडतर्फे आखली जाणार आहे. या कार्यक्रमावेळी भारताचे पंतप्रधान न्यूझीलंडला भेट देतील. 1925 साली भारतीय हॉकी फेडरेशनची पहिल्यांदा स्थापना झाली. त्यानंतर वर्षभराच्या कालावधीत भारतीय सेनादल हॉकी संघाने न्यूझीलंडचा दोरा केला होता. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनची स्थापना 1924 साली झाली होती. भारतीय हॉकी फेडरेशनने 1926 साली पहिल्यांदा न्यूझीलंडचा आंतरराष्ट्रीय हॉकी दौरा आयोजित केला होता आणि या दौऱ्यामध्ये भारतीय हॉकी संघाने 21 पैकी 18 सामने जिंकले होते. 1935 साली भारतीय हॉकी संघाने न्यूझीलंडचा दौरा केला होता. आणि या दौऱ्यात भारतीय संघाचे नेतृत्व ध्यानचंद यांनी केले होते. 1928, 1932, 1936 च्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये हॉकी सुवर्णपदक मिळवणाऱ्या भारतीय हॉकी संघामध्ये मेजर ध्यानचंद यांचा समावेश होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.