माडखोल येथे ३ डिसेंबर रोजी दिव्यांग मेळाव्याचे आयोजन
जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य
ओटवणे | प्रतिनिधी
जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधुन रविवारी ३ डिसेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता माडखोल भगवती हॉल येथे दिव्यांग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिव्यांग सेना, साई कृपा दिव्यांग गरजू निराधार संघटना, स्वाभिमानी दिव्यांग सेवा संस्था, आधार दिव्यांग कल्याण व पुनर्वसन संस्था यांच्यावतीने या दिव्यांग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात दिव्यांग बांधवांना संजय गांधी पेन्शन योजना, हयात दाखला विलंब, ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र, घरकुल व अंत्योदय योजना आदी विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग बचत गट स्थापना करून या बचत गटांना स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याबाबत चर्चा विनिमय करण्यात येणार आहे. दिव्यांग ॲट्रॉसिटी कायदा व दिव्यांग अधिनियम कायदा २०१६ संबंधी माहिती व जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच सर्व दिव्यांग संघटनांची जिल्हा समिती स्थापन करुन गावागावात जिल्हा समितीची शाखा स्थापन करून संघटना मजबूत करण्यात करण्यात येणार आहे.
या मेळाव्याला दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन संजय देसाई, साबाजी सावंत, विनोद गवस, अमित घोडकर, शैलेश नारकर, स्वप्निल लातये, महेंद्र चव्हाण, अजित जाधव, संदेश गुरव, आबिद शेख, सौ रेश्मा खडपकर, प्रवीण राऊळ, घनश्याम पडते, बाबाजी पास्ते आदींनी केले आहे.