गुड शेफर्डतर्फे सीबीएसई राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन
बेळगाव : बेळगाव येथील गुड शेफर्ड सेंट्रल स्कूलच्यावतीने सीबीएसई शालेय राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन दि. 23 ते 27 ऑक्टोबर 2024 रोजी रिंक रेस शिवगंगा स्पोर्ट्स क्लब व रोड रेस गणेश सर्कल रामतीर्थनगर बेळगांव येथे बुधवारपासून होत आहे. यास्पर्धेत संपूर्ण भारतातून 10 विभागीय झोन व विदेशी झोन सहभागी असतील, अशी माहिती गुडस् शेफर्ड स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रचिती आंबेकर यांनी दिली. गुडस् शेफर्ड येथे झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, दुबई, सौदी अरेबिया, ओमान, कतार, यूनायटेड स्टेट ऑफ अमिरात, येथून सुमारे 1000 च्या वर टॉप स्केटर्स सहभागी होणार असून या स्पर्धासाठी 1 बीएसई निरीक्षक भारतीय रोलर महासंघटना यांच्यावतीने 18 ऑफिशियल, बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्यावतीने 20 मदतनीस व गुड शेफर्ड सेंट्रल स्कूलचे 65 शिक्षक यांचा सहभाग राहिल. या स्पर्धेचे उद्घघाटन पोलीस आयुक्त येडा मार्टिन मार्बन्यांग यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, अमित घाटगे, प्रेरणा घाटगे, कर्नाटक रोलर स्केटिंग असो. सचिव इंदुधर सीताराम, ज्योती चिडक, निखिल चिंडक, सूर्यकांत हिंडलगेकर, विश्वनाथ यळ्ळूरकर, इम्रान बेपारी आदी उपस्थित होते.