For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तुळस येथे 'नवांकुर बालकुमार साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने शानदार सुरुवात

01:29 PM Dec 23, 2023 IST | अनुजा कुडतरकर
तुळस येथे  नवांकुर बालकुमार साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने शानदार सुरुवात
Advertisement

आनंदयात्री वाङ्मय मंडळ वेंगुर्लाचे आयोजन

Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-
नवांकुर बालकुमार साहित्य संमेलनासारखे स्तुत्य कार्यक्रम झाले पाहिजेत. साहित्याविषयी विद्यार्थ्यात आवड निर्माण केली पाहिजे. त्यासाठी तालुक्यात आनंदयात्री वाङ्मय मंडळ चांगले कार्य करत आहे असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी तुळस येथे नवांकूर बालकुमार साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीच्या उद्घाटन प्रसंगी केले.तुळस येथे आनंदयात्री वाङ्मय मंडळाने आयोजन केलेल्या नवांकूर बालकुमार साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या ग्रंथदिंडीच्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. चौगले हे होते. प्राचार्य डॉ. एम. बी. चौगले यांनी शुभेच्छा व्यक्त करताना आनंदयात्रीच्या अशा कार्यक्रमांमधूनच भविष्यातील साहित्यीक निर्माण होतील असे सांगितले.तुळस येथील नवांकुर बालकुमार साहित्य संमेलनानिमीत्त जैतीय मंदिर ते तुळस शिवाजी हायस्कुल अशा काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीच्या पालखीत संत साहित्यातील ग्रंथांची आकर्षक मांडणी केलेली होती. फुलानी सजवलेल्या पालखीसमोर श्री शिवाजी हायसस्कूल तुळसच्या विद्यार्थ्यांनी डोळयाचे पारणे फेडणारे असे लेझिम नृत्य व वारकरी नृत्य सादर करून सर्वांची वाहवा मिळवली. पालखीसमोर वेषभूषेतून साकारलेले विठ्ठल व रखुमाई सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. जैतिर मंदिर ते कुंभारटेंब पर्यंत जाऊन ग्रंथदिंडी हायस्कुलमध्ये येऊन विसर्जित करण्यात आली. तुळस हायस्कुलच्या प्रवेशद्वारावर दिंडीचे औक्षणाने स्वागत करण्यात आले.

या ग्रंथदिंडीमध्ये तुळस गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये सरपंच रश्मी परब, वाचनालयाचे अध्यक्ष सगुण माळकर, प्रकाश परब, कृष्णा तावडे, जयवंत तुळसकर, नारायण कुंभार, मंगेश सावंत, सद्गुरू सावंत, हायस्कूलचे मुख्याध्यापक अँन्थोनी डिसोझा, शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, प्रा. विवेक चव्हाण, अजित राऊळ, निवृत्त पोलीस सुधीर चुडजी, माधव तुळसकर, जयवंत तुळसकर, किरण राऊळ, सागर सावंत, विवेक तिरोडकर, माधव तुळसकर, पी. के. कुबल, संजय पाटील, महेश राऊळ, अँड. चैतन्य दळवी, चारूशीला दळवी, माधवी मातोंडकर, तुळस हायस्कूलचे सर्व विद्यार्थी इत्यादींचा दिंडीतील उत्साहपूर्ण सहभाग दिंडीची शोभा वाढवत होता. अत्यंत उत्साहपूर्ण जल्लोषी वातावरणात झालेली दिंडी संस्मरणीय अशी ठरली.

Advertisement

Advertisement
Tags :

.