महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चेन्नईत एअर अॅडव्हेंचर शोचे आयोजन

06:41 AM Oct 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राफेल अन् सुखोईने दाखविले हवाई सामर्थ्य

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

भारतीय वायुदलाने 92 व्या स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूच्या चेन्नईतील मरीना एअरफिल्डमध्sय एका एअर अॅडव्हेंचर शोचे आयोजन पेले आहे. 21 वर्षांमध्ये पहिल्यांदाच चेन्नईत वायुदल दिनसंबंधित सोहळ्याचे आयोजन झाले आहे. हजारोंच्या संख्येत लोकांनी वायुदलाच्या सामर्थ्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. वायुदलाच्या विमानांची शक्ती आणि गतिमानतेच्या आकर्षक हवाई प्रदर्शनाने चेन्नईवासीयांची मने जिंकली आहेत.

लाइटहाउस आणि चेन्नई बंदरादरम्यान मरीनावर आयोजित या सोहळ्यात वायुदल प्रमुख अमरप्रीत सिंह, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन, उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन, राज्याचे मंत्री, चेन्नईच्या महापौर आर. प्रिया आणि अन्य मान्यवरांनी भाग घेतला.

 

एअर शोची सुरुवात वायुदलाच्या गरुड कमांडोंकडून बचाव मोहिमेचे प्रात्यक्षिक आणि ओलिसांना मुक्त करविण्याच्या स्वत:च्या साहसी कौशल्याच्या प्रदर्शनाने करण्यात आली. मरीना बीचवर आयोजित झालेल्या भव्य एअर शोमध्ये भाग घेण्यासाठी सुलूर, तंजावर, तांबरम, अरक्कोणम आणि बेंगळूर येथून भारतीय वायुदलाच्या 72 विमानांनी उ•ाण केले होते.

या एअर शोमध्ये स्वदेशात निर्मित लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजससोबत राफेल, मिग-29 आणि सुखोई-30 एमकेआय यासारख्या अत्याधुनिक लढाऊ विमानांनी भाग घेतला आहे. याचबरोबर सूर्यकिरण एरोबेटिक्स टीम आणि सारंग हेलिकॉप्टर डिस्प्ले टीमने देखील आकाशात स्वत:च्या कौशल्याचे प्रदर्शन पेले आहे. नौदलाचे पी8आय आणि विंटेज डकोटा देखील फ्लायपास्टमध्ये सामील झाले.

एअर शोच्या तयारीसाठी चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे हवाईक्षेत्र 8 ऑक्टोबरपर्यंत काही काळासाठी 15 मिनिटांपासून 2 तासांपर्यंत बंद राहणार आहे. यादरम्यान कुठलेही नागरी विमान लँड करू शकणार नाही तसेच उ•ाण करू शकणार नाही.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article