For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काही तासच जगणारे जीव

06:46 AM Sep 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
काही तासच जगणारे जीव
Advertisement

अत्यंत लवकर होतो मृत्यू

Advertisement

जगात माणसांचे सरासरी आर्युमान 70-72 वर्षांदरम्यान आहे. परंतु अनेक असे जीव आहेत, ज्यांचे सरासरी आर्युमान केवळ काही तासांचे आहे.

डास

Advertisement

डासांच्या काही प्रजाती म्हणजेच नर एनोफिलिज केवळ काही तासांसाठीच जिवंत राहतात. हे डास प्रौढ होताच प्रजननासाठी सहकारी शोधतात आणि प्रजननानंतर त्यांचा मृत्यू होतो. तर मादी एनोफिलिज डास जी रक्त शोषून घेते, तिचे आर्युमान नराच्या तुलनेत अधिक असते.

मे-फ्लाई

मे-फ्लाईला एपेमेरोप्टेरा नावाने देखील ओळखले जाते. याचे आयुष्यही कमी असते. मे-फ्लाई प्रौढ झाल्याच्या काही तासांपासून कमाल एक दिवसांपर्यंतच जिवंत राहू शकतो. यादरम्यान हा प्रजनन करतो आणि मग मरून जातो. मे-फ्लाईचे अधिक आयुष्य पाण्यात लार्वाच्या स्वरुपातच संपते.

एंटोमेरिया

एंटोमेरिया एक प्रकारचा कीटक असून तो प्रौढ झाल्यावर केवळ 3-5 तासांपर्यंतच जगतो. यादरम्यान हा कीटक साथीदाराचा शोध घेतो आणि प्रजनन करतो. या जीवाचा बहुतांश हिस्सा लार्वाच्या स्वरुपात जात असतो.

गॅल मिज

गॅल मिज  एक छोटा किटक असून त्याचे जीवन काही तासांचेच असते. हा किटक रोपांवर स्वत:च्या पिल्लांना जन्म देतो. मिज हा केवळ प्रजननासाठी जिवंत राहतो आणि मग मरून जातो.

सिल्क मॉथच्या

याच्या काही प्रजाती म्हणजेच बोमबिक्स मॉरी केवळ 24 तासांपर्यंत जिवंत राहते. या जीवांकडे तोंड नसते, यामुळे ते अन्न खाऊ शकत नाहीत. या जीवांचे आयुष्य सहकारी शोधणे आणि अंडी देण्यापुरतीच मर्यादित असते.

स्टेनोफिजिया

स्टेनोफिजिया एक प्रकारचा जल किट असून त्याचे जीवन काही तासांचेच असते. जन्मल्यावर हा किटक साथीदार शोधतो आणि प्रजनन करतो आणि मग मरून जातो. या जीवांचे बहुतांश आयुष्य लार्वाच्या स्वरुपातच संपत असते.

Advertisement
Tags :

.