कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जैविक कचरा पोषक घटकात रुपांतरित होणार

06:18 AM May 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अपशिष्टापासून पोषणाचे तंत्रज्ञान विकसित

Advertisement

जैविक कचऱ्याला उपयुक्त पोषक घटकात रुपांतरित करण्यासाठी पर्यावरणतज्ञांनी ‘अपशिष्टापासून पोषण’ तंत्रज्ञान विकसित केले आहे. याचा उद्देश कृषी, अन्नापासून उत्पन्न जैविक कचऱ्याला उपयोगी पोषक घटक किंवा खाद्य स्रोतांमध्ये परिवर्तित करणे आहे, जेणेकरून मनुष्य किंवा प्राणी याचे सेवन करू शकतील. या तंत्रज्ञानामुळे कचऱ्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावता येईल आणि याच्या पर्यावरणीय प्रभावांमध्ये देखील उल्लेखनीय घट होईल.

Advertisement

फ्रान्समध्ये करण्यात आलेल्या अध्ययनानुसार जैविक कचऱ्यावर प्रक्रिया करत त्याला मूल्यवान पोषक घटकांमध्ये बदलण्यासाठी विभिन्न नवोन्मेष करण्यात आले आहेत. कीट पालन (इंसेक्ट फार्मिंग)द्वारे कृषी अवशेष आणि खाद्य अपशिष्टावर किटकांना पाळले जाते, ज्यांचा वापर पशू आहार किंवा मानवा आहाराच्या स्वरुपात केला जाऊ शकतो.

ठोस किण्वन (सॉलिड स्टेट फर्मेंटेशन)मध्ये यीस्ट यासारख्या सुक्ष्मजीवांच्या सहाय्याने खाद्य सह-उत्पादनांना पोषणसामग्रीत बदलले जाते. याचबरोबर रोपांपासून प्रोटीन निष्कर्षण म्हणजेच वनस्पती अपशिष्टापासून थेट प्रोटीन प्राप्त केले जातात, ज्यांना आहार अनुपूरकच्या स्वरुपात वापरले जाऊ शकते.

अशाचप्रकारे मायक्रोप्रोटीन आणि मायक्रोबियल प्रोटीन उत्पादन देखील केले जाऊ शकते. याच्या अंतर्गत बॅक्टेरियासारख्या सुक्ष्मजीवांच्या माध्यमातून प्रोटीन तयार केले जातात, जे पर्यायी प्रोटीन स्रोतांच्या स्वरुपात वापरले जाऊ शकतात. हे अध्ययन नेचर सस्टेनेबिलिटीमध्ये प्रकाशित झाले आहे.

 

अनेक घटक निर्भर

या नवोन्मेषांच्या पर्यावरणीय दक्षतेवर अनेक घटक निर्भर आहेत, विशेषकरून वापरकर्ता या उत्पादनांना किती स्वीकृती देतो हे महत्त्वाचे असल्याचे अध्ययनातून समोर आले आहे. या तंत्रज्ञानांनी तयार प्रोटीनचा वापर मोठ्या प्रमाणावर मांसाच्या जागी करण्यात आला तर कमीतकमी 80 टक्के रिप्लेसमेंट तसेच यापासून पर्यावरणीय लाभ अधिक असू शकतात. थेट जैविक कचऱ्याला पशू आहारात वापरणे आता देखील एक अत्यंत प्रभावी आणि कमी खर्चिक पद्धत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article