For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तीन अधिकाऱ्यांना हटवण्याचे आदेश

06:59 AM Jun 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
तीन अधिकाऱ्यांना हटवण्याचे आदेश
Advertisement

‘एअर इंडिया’वर डीजीसीएची कारवाई : 10 दिवसात एअरलाईन्सकडून मागितला अहवाल

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अहमदाबाद विमान अपघातप्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) शनिवारी एअर इंडियाविरुद्ध कठोर भूमिका घेत क्रू शेड्युलिंग विभागातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ प्रभावाने काढून टाकण्याचे आदेश दिले. विमान वाहतूक सुरक्षा प्रोटोकॉलचे गंभीर उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. चुडा सिंग (विभागीय उपाध्यक्ष), पिंकी मित्तल (मुख्य व्यवस्थापक - क्रू शेड्युलिंग) आणि पायल अरोरा (क्रू शेड्युलिंग - नियोजन) यांचा कारवाई झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे. या अधिकाऱ्यांना क्रू शेड्युलिंगच्या जबाबदारीतून तात्काळ काढून टाकावे, असे निर्देश डीजीसीएने दिली. तर दुसरीकडे, एअर इंडियाने डीजीसीएचा आदेश लागू करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

Advertisement

डीजीसीएने एअर इंडियाला क्रू शेड्युलिंग आणि रोस्टरिंगशी संबंधित भूमिकांमधून तिन्ही अधिकाऱ्यांना तात्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले. सदर अधिकारी अनेक गंभीर निष्काळजीपणात सहभागी असल्याचा दावा करण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत कंपनीचे मुख्य ऑपरेशन्स अधिकारी थेट एकात्मिक ऑपरेशन्स कंट्रोल सेंटरवर लक्ष ठेवतील. हा आदेश 20 जून रोजी देण्यात आला असून तो शनिवारी उघडकीस आला. 12 जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर हा निर्णय घेण्यात आला. लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान एआय-171 टेकऑफ केल्यानंतर लगेचच कोसळले. विमान मेडिकल कॉलेज हॉस्टेलवर कोसळल्यामुळे प्रवाशांसह एकूण 275 लोकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये केवळ विमानातील प्रवासीच नाही तर जमिनीवर उपस्थित असलेले अनेक लोक देखील होते.

20 जून रोजी डीजीसीएने जारी केलेल्या आदेशानुसार, कारवाई करण्यात आलेले अधिकारी अनेक गंभीर चुकांमध्ये सहभागी असल्याचे आढळून आले. ज्यामध्ये अनधिकृत आणि नियमांविरुद्ध क्रू तैनात करणे, परवाना व क्रू विश्रांती नियमांचे उल्लंघन करणे आणि देखरेख प्रणालीतील व्यापक त्रुटी यांचा समावेश होता.

10 दिवसांत अंतर्गत शिस्तभंगाच्या कारवाईचे निर्देश

डीजीसीएने आता एअर इंडियाने या अधिकाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या कर्तव्यातून तात्काळ काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, एअर इंडियाला या अधिकाऱ्यांविरुद्ध अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्याचे आणि 10 दिवसांत डीजीसीएला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अधिक्रायांविरुद्ध तात्काळ अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई सुरू करावी आणि या कारवाईचा अहवाल 10 दिवसांत सादर करावा. तसेच, पुढील सूचना मिळेपर्यंत त्यांना  विमानो•ाण सुरक्षा आणि क्रू अनुपालनावर थेट परिणाम होईल असे कोणतेही पद देऊ नये, असेही बजावले आहे.

पुढील निष्काळजीपणाबद्दलही कडक इशारा

कोणत्याही पोस्ट-ऑडिट किंवा तपासणीमध्ये क्रू शेड्यूलिंग मानदंड, परवाना किंवा उ•ाण वेळेच्या मर्यादेचे भविष्यात उल्लंघन झाल्यास कठोर अंमलबजावणीची कारवाई केली जाईल. यामुळे परवाना रद्द होऊ शकतो किंवा ऑपरेटर परवानगी रद्द होऊ शकते आणि दंड आकारला जाऊ शकतो, असे आदेशात स्पष्ट केले आहे.

एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस जारी

डीजीसीएने एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 16 आणि 17 मे 2025 रोजी बेंगळूरहून लंडनला जाणाऱ्या दोन विमानांवर (एआय 133) ही नोटीस बजावण्यात आली आहे. या सेवांनी जास्तीत जास्त 10 तासांचा उ•ाण वेळ ओलांडला होता. डीजीसीएने एअर इंडियाला विमान कायदा आणि नागरी विमान वाहतूक नियमांनुसार त्यांच्याविरुद्ध कारवाई का सुरू करू नये याबद्दल 7 दिवसांच्या आत उत्तर देण्यास सांगितले आहे.

Advertisement
Tags :

.