महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अनुदानित शाळांमधील शिक्षक नियुक्तीचा आदेश

11:35 AM Aug 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

2016 ते 2020 पर्यंतच्या रिक्त पदांवर होणार नियुक्ती

Advertisement

बेळगाव : खासगी अनुदानित उच्च माध्यमिक शाळा आणि पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षक पदांवर नियुक्तीचा आदेश राज्य सरकारने बुधवारी बजावला आहे. यामुळे मागील अनेक वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांचा मार्ग मोकळा झाला आहे. बेळगाव जिल्ह्यातील अनेक अनुदानित शाळांमधील शेकडो शिक्षकांना राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. निवृत्त, स्वेच्छानिवृत्ती, मृत्यू, राजीनामा व इतर कारणांमुळे राज्यातील अनेक अनुदानित उच्च माध्यमिक शाळा व पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त होती. ही पदे भरली जावीत, अशी मागणी अनेक वर्षांपासून शिक्षण संस्थांकडून केली जात होती. यापूर्वी 31-12-2015 पर्यंतच अनुदानित शाळांमधील भरती करण्यात आली होती. त्यानंतर भरती प्रक्रिया थांबविण्यात आल्याने शेकडो उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने महसूल विभागाला नियुक्तीसंदर्भात विचारणा केली. नियुक्ती झालेल्या शिक्षकांच्या पगाराचा बोजा राज्य सरकारला सहन करावा लागणार असल्याने महसूल विभागाकडे विचारणा केली होती. महसूल विभागाने हिरवाकंदील देताच राज्य सरकारने नियुक्तीबाबत आदेश दिले. 1-1-2016 ते 31-12-2020 पर्यंतच्या रिक्त जागांवर शिक्षकांना नियुक्ती दिली जाणार असल्याचे आदेश राज्य सरकारने दिल्याने अनेक शिक्षकांचे नोकरीत कायम होण्याचे मार्ग मोकळे झाले आहेत.

Advertisement

शिक्षकांना राज्य सरकारच्या निर्णयाचा फायदा होणार

बेळगाव जिल्ह्यात अनेक खासगी अनुदानित शाळांमध्ये अनेक वर्षांपासून शिक्षक सेवा बजावत आहेत. परंतु त्यांच्या नियुक्तीचा आदेश अद्याप मिळालेला नव्हता. बुधवारी सायंकाळी उशिरा नियुक्तीचे आदेश दिल्यामुळे 2016 ते 2020 या दरम्यानच्या शिक्षकांना सेवेत कायम केले जाणार आहे. यामुळे बेळगावमधील अनेक शिक्षकांना राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे.

 -रामू अ. गुगवाड, मुख्य सचिव,राज्य माध्यमिक शाळा साहाय्यक शिक्षक संघ

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article