For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मळगाव येथील वाचन मंदिरात १६ डिसेंबरला वक्तृत्व स्पर्धा

12:36 PM Dec 06, 2023 IST | अनुजा कुडतरकर
मळगाव येथील वाचन मंदिरात १६ डिसेंबरला वक्तृत्व स्पर्धा
Advertisement

न्हावेली / वार्ताहर
मळगाव येथील कै.प्रा.उदय रमाकांत खोनोलकर वाचनालयात शनिवार १६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता प्राथमिक व माध्यमिक गटांसाठी कै.सौ. मालती खानोलकर स्मृती वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा सावंतवाडी,दोडामार्ग,कुडाळ,वेंगुर्ला या तालुक्यासाठी मर्यादित आहे.

Advertisement

पाचवी ते सातवी या गटासाठी माझा आवडता छंद, आजी -आजोबा आणि आम्ही ,मोबाईलने बालपण हरवतेय हे विषय ठेवण्यात आले असून स्पर्धकाने कोणत्याही एका विषयावर ४ ते ५ मिनिटे बोलायचे आहे.आठवी ते दहावी गटासाठी भारताची चंद्रभरारी ,आजची जीवनशैली ,आणि आपले आरोग्य ,नैसर्गिक आपत्तीचे वाढते प्रमाण धोक्याची घंटा, हे विषय ठेवण्यात आले असून स्पर्धकाने कोणत्याही एका विषयावर ५ ते ६ मिनिटे बोलायचे आहे.एका प्रशाळेतून जास्तीत जास्त ३ विद्यार्थ्याना स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे.प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे १०००,७५०,५०० रुपये रोख तसेच दोन उत्तेजनार्थ क्रमांकांना रोख २०० रुपये व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.स्पर्धकांना एसटी प्रवासाचा खर्च देण्यात येणार आहे.स्पर्धकांनी १५ डिसेंबरपर्यत ग्रंथपाल आनंद देवळी यांच्याकडे नावनोंदणी करण्याचे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष हेमंत खानोलकर व कार्यवाह गुरुनाथ नार्वेकर यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.