महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची बढती प्रक्रियेअंतर्गत तोंडी परीक्षा
बेळगाव : सरकारी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना बढती देण्यासोबतच पगारवाढीसाठी परीक्षा द्यावी लागते. लेखी परीक्षेसह तोंडी परीक्षाही घेतली जाते. सध्या केपीएससी अंतर्गत महापालिका कार्यालयात बेळगाव विभागातील कर्मचाऱ्यांची तोंडी परीक्षा घेतली जात आहे. एकूण 196 कर्मचारी या तोंडी परीक्षेमध्ये सहभागी होणार आहेत. कर्नाटक पब्लिक सर्व्हिस कमिशन (केपीएससी) अंतर्गत कर्मचाऱ्यांना बढती दिली जाते. बढती मिळवण्यासाठी लेखी व तोंडी परीक्षा देणे आवश्यक असते. बेळगाव महानगरपालिकेमध्ये अशा कर्मचाऱ्यांची सध्या तोंडी परीक्षा घेतली जात आहे. सोमवारी व मंगळवारी असे दोन दिवस परीक्षा होणार आहे. त्यामुळे परीक्षा देण्यासाठी कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. सरकारच्या अनेक विभागांमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी सकाळपासून मनपा कार्यालयात उपस्थित होते. लेखी परीक्षा पूर्ण झाली असून आता तोंडी परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षा घेण्यासाठी तज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे.