तोंडावाटे पिल्लांना जन्म देणारा प्राणी
वैद्यकीय शास्त्रानुसार मुलांना जन्म देण्यासाठी देखील पूर्ण प्रकिया निर्माण झालेली आहे. परंतु एक प्राणी स्वत:च्या तोंडावाटे पिल्लांना जन्म देत असतो. आमच्या आसपास असंख्य जीव अस्तित्वात असतात. तर या सर्व जीवांची शारीरिक संरचना देखील वेगवेगळी असते.
बहुतांश जीवांचे स्वत:चे असे एक वैशिष्ट्या असते, ज्यामुळे त्यांना ओळखले जाते, काही जीवांमध्ये माणसांप्रमाणे लक्षणं असतात, तर काही जीवांचा आवाज वेगळा असतो. परंतु एक जीव खासकरून त्याच्या प्रजननासाठी ओळखला जातो. कारण हा जीव तोंडावाटे पिल्लांना जन्म देत असतो. बेडकाच्या शेकडो प्रजाती पृथ्वीवर आहेत. परंतु एक खास प्रकाराचे बेडुक अंड्यांना हॅचिंग करण्यासाठी स्वत:च्या तोंडाचा वापर करते. गॅस्ट्रिक-ब्रूडिंग बेडकाच्या पिल्लांना जन्म देण्याची पद्धत अत्यंत वेगळी आहे. हा बेडुक अंडी दिल्यावर ती गिळून टाकतो, अंड्यावरील खास रसायनाचे आवरण त्यांना पोटात गॅस्ट्रिक अॅसिडपासून वाचविते.
अंड्यातून पिल्लू बाहेर पडेपर्यंत ते पोटातच राहते. मग ही पिल्लं बेडकाच्या तोंडावाटे बाहेर पडतात. हा बेडुक एकावेळी 25 पिल्लांना जन्म देऊ शकतो. परंतु 1980 च्या दशकाच्या मध्याला बेडकांची ही प्रजाती विलुप्त झाली. पूर्वी ही प्रजाती ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँडच्या एका छोट्या भागात आढळून यायची. गॅस्ट्रिक-ब्रूडिंग बेडूक एकमात्र असा बेडुक आहे जो तोंडावाटे पिल्लांना जन्म देतो.