कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मध्य आशियातून पाकिस्तानवर एअरस्ट्राइकचा पर्याय

06:06 AM May 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वायुदलाच्या विदेशी वायुतळामुळे पाकिस्तान भयभीत

Advertisement

नवी दिल्ली

Advertisement

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय संरक्षण दलांना पाकिस्तान विरोधात मोहीम राबविण्यासाठी खुली सूट दिली आहे. भारतीय सैन्य पाकिस्तानला धडा शिकविण्याची तयारी करत असल्याचे मानले जात आहे. अशास्थितीत पाकिस्तान आता मध्य आशियातील भारतीय वायुदलामुळे घाबरून गेला आहे. या वायुतळावरून भारत पाकिस्तानच्या सामरिक योजना, गुप्तचर माहिती, टेहळणी आणि आक्रमक कारवायांविषयी माहिती जमवू शकताहे. पाकिस्तानने भारतासोबतचा तणाव पाहता स्वत:च्या पूर्व सीमेवर हवाई सुरक्षा मजबूत केली आहे, परंतु पश्चिमेकडील अफगाणिस्तानला लागून असलेल्या सीमेवरील त्याची हवाई सुरक्षा अत्यंत कमकुवत आहे.

अमेरिकेने 2011 मध्ये ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात घुसून ठार केले होते, तेव्हाही पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवरील हवाई सुरक्षा यंत्रणा तोकडी पडली होती. पाकिस्तानची कुठलीच हवाई सुरक्षा यंत्रणा त्या सीमेवर तैनात नाही. लादेन मारला गेल्याच्या 14 वर्षांनी देखील पाकिस्तानच्या पूर्व आणि उत्तर सीमा अद्याप असुरक्षित आहेत. भारतीय वायुदल या क्षेत्रांद्वारे पाकिस्तानात तुलनेत सहजपणे मोहीम राबवू शकते.

भारताचा हा विदेशी वायुतळ पाकिस्ताननजीक ताजिकिस्तानात असून त्याविषयी फारशी माहिती लोकांना नाही. हा वायुतळ पाकिस्तानव्याप्त काश्मीरपासून केवळ 600 किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर आहे. भारताने मागील 30 वर्षांपासून ताजिकिस्तानात स्वत:ची सैन्य उपस्थिती कायम राखली आहे आणि 1990 च्या दशकात भारताने अफगाणिस्तानच्या सीमेनजीक ताजिकिस्तानच्या फरखोर क्षेत्रात एक सैन्य रुग्णालय स्थापन केले होते. हा सैन्य रुग्णालय तालिबानच्या पहिल्या राजवटीच्या काळात तालिबानच्या विरोधात लढणाऱ्या अन्य अफगाणी समुहांच्या सदस्यांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरले होते.  9/11 च्या हल्ल्यानंतर भारत सरकारने दक्षिण ताजिकिस्तानात गिसार सैन्य वायुतळाला विकसित करण्याचा विचार केला होता, ज्याला आयनी वायुतळ या नावाने देखील ओळखले जाते.

भारताचा वायुतळ महत्त्वपूर्ण

भारताचा आयनी वायुतळ ताजिकिस्तानची राजधानी दुशांबेनजकी आणि उत्तर अफगाणिस्तान सीमेपासून 150 किलोमीटर अंतरावर आहे. तत्कालीन वाजपेयी सरकार आणि संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी या प्रकल्पाचे जोरदार समर्थन केले होते. भारताचे वर्तमान एनएसए अजित डोवाल आणि माजी वायुदलप्रमुख बी.एस. धनोआ यांनीही हा तळ स्थापन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. गिस्स्रमध्ये धावपट्टीला 3200 मीटरपर्यंत वाढविण्यात आले होते. ही लांबी बहुतांश फिक्स्ड-विंग विमानांच्या उतरण्यासाठी आणि उ•ाण करण्यासाठी पुरेशी होती. भारतीय टीमने हँगर, ओव्हरहॉलिंग आणि विमानांमध्ये इंधन भरण्याची क्षमताही विकसित केली आहे. भारताने आयनी वायुतळाला विकसित करण्यासाठी 100 दशलक्ष डॉलर्स खर्च केले आहेत. भारताने एसयू-30एमकेआय लढाऊ विमानांना देखील या वायुतळावर तैनात केल्याचा दावा अनेक अहवालांमध्ये केला जातो.

आयनी वायुतळाची रणनीतिक भूमिका

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आयनी वायुतळावरुन मोहीम फत्ते करत भारत पुन्हा एकदा पाकिस्तानला धक्का देऊ शकतो. हा वायुतळ भारताच्या अनेक सामरिक गरजा पूर्ण करू शकतो. तसेच यामुळे पाकिस्तानला स्वत:ची रणनीति पुन्हा ठरवावी लागणार आहे. त्याला स्वत:च्या हवाई सुरक्षा यंत्रणेचा एक हिस्सा भारतीय सीमेवरून हटवत अफगाणिस्तानच्या सीमेनजीक तैनात करावी लागेल. याचबरोबर पाकिस्तानला स्वत:च्या क्षेपणास्त्रांना पश्चिम सीमेवर पाठवावे लागेल,यामुळे मर्यादित साधनसामग्रीला सामोरे जाणारे पाकिस्तानी सैन्य आणखी संकटात सापडलणार आहे.

भारत या तळावरून पाकिस्तानातील गुप्तचर माहिती जमविणे, टेहळणी मोहीमही सुरू करू शकतो. पेशावर या तळापासून केवळ 500 किलोमीटर अंतरावर आहे. तर इस्लामाबाद आणि पीओके केवळ 600 किलोमीटर अंतरावर आहे. परंतु भारताला अशाप्रकारच्या कुठल्याही मोहिमेसाठी अफगाणिस्तानचे हवाईक्षेत्र वापरावे लागणार आहे. अफगाणिस्तानकडे स्वत:ची कुठलीही हवाई सुरक्षा यंत्रणा किंवा रडार नसल्याने भारताच्या मोहिमेविषयी त्याला थांगपत्ता लागू शकणार नाही.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article