कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पूजा नाईक यांच्या संरक्षणार्थ एकवटले विरोधी राजकीय नेते

06:22 AM Nov 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नोकरभरती लाच प्रकरणाचा तपास मुळापर्यंत करण्याची मागणी

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

Advertisement

सरकारातील मंत्री, आयएएस असणारे अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यामार्फत सरकारी नोकऱ्यांसाठी सुमारे 17 कोटी ऊपये दिल्याचा बॉम्बगोळा टाकणाऱ्या पूजा नाईक या महिलेला सरकारने सुरक्षा पुरवावी, अशी राज्यातील विरोधी राजकीय पक्षाच्या नेत्यांनी काल शनिवारी जोरदार मागणी केली.

सरकारी नोकरीत पैशांचा व्यवहार झाल्याचा संशय आल्याने यापूर्वीच याविऊद्ध राजकीय पक्षांनी आवाज उठवला होता. आता तर चक्क पूजा नाईक यांनी स्वत: 600 नोकऱ्यांसाठी सुमारे 17 कोटी ऊपये मंत्र्यापर्यंत पोहचविल्याचे सांगितल्याने हे प्रकरण गांभीर्याने घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या नोकरभरती प्रकरणाच्या मुळाशी जायला हवे, अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी केली.

24 तासामध्ये नोकऱ्यांसाठी घेतलेले पैसे परत न केल्यास मंत्री, सरकारी खात्यातील संचालक आणि सार्वजनिक बांधकाम खात्यातील अभियंता या सर्वांची नावे उघड करण्याचा इशारा दिल्याने पूजा नाईक यांच्या जीवाला धोका संभवतो. राज्यात अनेक गुन्हेगारी घटना घडत आहेत, त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडली आहेच. त्यातच पूजा नाईक यांनी मंत्र्याचे नाव उघड करण्याचा इशारा दिल्यामुळे त्यांच्यावरही हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांना पूर्ण संरक्षण मिळावे, अशी मागणी पोलिस महासंचालक अलोक कुमार, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे करीत आहेत, असेही सुनील कवठणकर म्हणाले.

पूजा नाईक यांचा बॉम्बगोळा; मंत्री कोण?

पूजा नाईक या महिलेने नोकरी मिळवून देण्यासाठी एका मंत्र्याने सुमारे 17 कोटी ऊपये घेतल्याचा दावा शुक्रवारी केल्यानंतर भाजप सरकारातील हा मंत्री कोण अशी चर्चा शनिवारी दिवसभर सुरू होती. पूजा नाईक यांच्या या खळबळजनक दाव्यामुळे भाजपच्या गोटातही चिंता पसरलेली आहे. जर मंत्र्याने पैसे घेतले असतील आणि त्याच्यावर आरोप होत असतील तर त्याची चौकशी व्हायलाच हवी, अशा प्रतिक्रियाही दिवसभरात सामाजिक माध्यमाद्वारे उमटत होत्या.

आता मुख्यमंत्र्यांनीच स्पष्टीकरण द्यावे : अमित पालेकर

पूजा नाईक यांनी नोकरभरती प्रकरणात केलेले आरोप हे खळबळजनक आहेत. या आरोपामुळे भाजप सरकारचे भ्रष्टाचाराचे पितळ उघडले झाले आहे. 17 कोटी ऊपयांच्या ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळ्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मौन न बाळगता स्पष्टीकरण द्यावे. कारण नोकऱ्यांसाठी लाच घेणारा हा मंत्री कोण? रॅकेटमध्ये सहभागी असलेला कोणता अधिकारी? या सर्वांची उकल व्हायला हवी,  अशी मागणी आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. अमित पालेकर यांनी सामाजिक माध्यमांद्वारे केली आहे.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article