For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वायनाडच्या पुनर्बांधणीत विरोधी पक्षाचाही हातभार

06:34 AM Aug 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
वायनाडच्या पुनर्बांधणीत विरोधी पक्षाचाही हातभार
Advertisement

‘युडीएफ’चे आमदार देणार एक महिन्याचे वेतन, भूस्खलनामुळे उद्ध्वस्त झालेल्या पुनर्वसनात भाग

Advertisement

वृत्तसंस्था/ कोची

भूस्खलनाने उद्ध्वस्त झालेल्या वायनाडच्या पुनर्बांधणीसाठी राज्य सरकारला पूर्ण पाठिंबा देण्याची तयारी केरळमधील विरोधी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युडीएफने दर्शवली आहे. युडीएफचे सर्व आमदार मुख्यमंत्री आपत्ती मदतनिधीमध्ये (सीएमडीआरएफ) एक महिन्याचे वेतन देतील, असे रविवारी जाहीर करण्यात आले.

Advertisement

विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन यांनी रविवारी भूस्खलनग्रस्त वायनाडसाठी मदत देण्याची घोषणा केली. युडीएफ सर्व पुनर्वसन प्रयत्नांमध्ये सहभागी होऊन बचावलेल्यांच्या जीवनात सामान्य स्थिती आणण्यासाठी प्रयत्न करेल, असे ते म्हणाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यापूर्वी पक्षाकडून 100 घरे बांधण्याची घोषणा केली आहे. त्याव्यतिरिक्त आता युडीएफने स्वतंत्र पुनर्वसन पॅकेज जाहीर केले आहे. यापूर्वी, सत्ताधारी सीपीआय(एम) च्या नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडीने (एलडीएफ) विधानसभा आणि संसदेतील सदस्य आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री फंडासाठी देतील असे स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :

.