ओप्पोचा फाईंड एक्स-9 स्मार्टफोन पुढील महिन्यात येणार
50 एमपीचा कॅमेरा, 7 हजार एमएएचची दमदार बॅटरी
मुंबई :
चीनी मोबाईल कंपनी ओप्पो यांनी आपला नवा फाईंड एक्स-9 मोबाइल स्मार्टफोन लाँच करण्याचे जाहीर केले आहे. कॅमेराप्रेमींकरीता हा फोन खास असणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. सदरचा फाईंड एक्स-9 हा स्मार्टफोन पुढील महिन्यात भारतीय बाजारात सादर केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. सदरचा स्मार्टफोन चीनमध्ये 16 ऑक्टोबरला ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.
सदरच्या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमनसिटी 9500 चिपसेट दिली जाणार असून फाईंड एक्स-9 व फाईंड एक्स-9 प्रो हे दोन मोबाईल कंपनीकडून सादर केले जाणार आहेत. पुढील महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये फोन दाखल होणार असून त्यासंदर्भातील तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. वरीलप्रमाणे दिली गेलेली चिपसेट ही अँड्रॉइड फोनधारकांसाठी महत्त्वाची असणार आहे. एआय संबंधीत वैशिष्ट्यो यामध्ये असतील असे म्हटले जात आहे.
रंग व इतर वैशिष्ट्यो
कलर ओएस 16 या ऑपरेटींग सिस्टीमवर सदरचा स्मार्टफोन चालणार असून 16 जीबी रॅमपर्यंत याची सर्वाधिक क्षमता राहणार आहे. तर स्टोरेज क्षमता तब्बल 1 टीबी इतकी सर्वाधिक असेल अशी माहितीही मिळते आहे. लाल, टिटॅनियम आणि पांढऱ्या रंगासोबत स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. किमतीबाबतचा खुलासा कंपनीकडून करण्यात आलेला नाही.
फोनसंदर्भातील वैशिष्ट्यो...
? फाईंड एक्स, एक्स प्रो
? 224 ग्रॅम वजन
? 32एमपी फ्रंट कॅमेरा, 50 एमपी सोनी मुख्य कॅमेरा, 50 एमपी सॅमसंग अल्ट्रावाइड कॅमेरा, 50 एमपी टेलिफोटो कॅमेरा
? 7025 एमएएच बॅटरी
? 6.5 इंचाचा ओएलइडी स्क्रीन डिस्प्ले
? 80 डब्ल्यू वायरड व 50 डब्ल्यू वायरलेस चार्जर