ओप्पोची एफ 31 आवृत्ती बाजारात
सुरुवातीची किंमत 22,999 रुपये : बॅटरी 7000 एमएएच क्षमतेसह मिळणार
नवी दिल्ली :
टेक कंपनी ओप्पोने भारतात नवीन मिड-रेंज स्मार्टफोन सीरीज एफ 31 लाँच केला आहे. त्यात ओप्पो एफ 31, ओप्पो एफ 31 प्रो आणि ओप्पो एफ 31 प्रो प्लस मॉडेल्सचा समावेश आहे. फोनमध्ये 7000 एमएएच क्षमतेची बॅटरी असून 50 एमपी कॅमेरा आहे. यात 80डब्लू फास्ट चार्जिंग आणि आयपी 69 रेटिंग देखील आहे.
ओप्पो एफ 31 सिरीजची सुरुवातीची किंमत 22,999 रुपये ठेवण्यात आली आहे. 27 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाइन रिटेल स्टोअर्स, ओप्पो ई-स्टोअर, फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर त्याची विक्री सुरू होईल. सेलच्या पहिल्या दिवशी प्री-बुकिंग आणि कॉलिंगवर बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनस उपलब्ध असेल. या फोनपैकी एक 6.8 इंच व दोन स्मार्टफोन्स 6.5 इंचाच्या अमोलेड डिस्प्लेसह येणार आहेत. कलर ओएस 15 वर आधारीत हे स्मार्टफोन अँड्रॉइड 15 वर चालतील. 8 जीबी रॅम, 12 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेजसह फोन्स सादर करण्यात आले आहेत. सदरचा फोन हिमालयन व्हाइट, जेमस्टोन ब्ल्यू, फेस्टीव्हल पिंक या रंगात सादर करण्यात आला आहे. कॅमेराचा विचार करता 50 मेगापिक्सलचा मुख्य रिअर सेन्सर, 2 एमपीचा मोनोक्रोम लेन्स, 32 एमपीचा फ्रंट कॅमेरा फोनमध्ये असणार आहे.