For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वत:च देव असल्याच्या भ्रमात विरोधकांनी राहू नये

12:44 PM Oct 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
स्वत च देव असल्याच्या भ्रमात विरोधकांनी राहू नये
Advertisement

विरोधकांच्या शक्तीप्रदर्शनावर डॉ. मुख्यमंत्री सावंत यांचा पलटवार

Advertisement

पणजी : आपण स्वत:च देव, या भ्रमात विरोधकांनी राहू नये. कारण जनता हीच सर्वेसर्वा आहे. आम्ही अनेक वर्षांपासून जनतेची सेवा करीत आलो आहोत आणि यापुढेही करीत राहणार आहोत. त्यामुळे विरोधकांनी नको तो भ्रम बाळगू नये, असा पलटवार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला. फातोर्डा मतदारसंघात आमदार विजय सरदेसाई यांनी श्रीकृष्ण विजयोत्सव कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आरजीपीचे प्रमुख मनोज परब, गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी एकत्र येत शक्तीप्रदर्शन घडवले होते. या शक्तिप्रदर्शनावेळी मनोज परब यांनी सत्तेत असलेल्या नरकासुरांना उजो लागला, असा टोमणा मारला होता. या शक्तिप्रदर्शनानंतर मुख्यमंत्री सावंत यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, कोण नरकासुर आणि कोण देव? हे विरोधकांनी सांगावे. विरोधक जर स्वत:ला देव म्हणत असतील, तर त्या भ्रमात राहू नये. जनता ही सर्वेसर्वा आहे. जनतेच्या पाठबळावर आम्ही गोव्यासाठी जे करायला हवे ते केले आहे आणि यापुढेही करीत राहणार आहोत. विरोधकांनी जनतेची दिशाभूल कायमच केली आहे. परंतु भाजप हा तळागाळातील लोकांचा विचार करणारा पक्ष आहे. त्यामुळे सरकारकडून करण्यात येणारा राज्याचा विकास हा तळागाळातील लोकांपर्यंत पोहचावा, यासाठी आम्ही कार्यरत आहोत. विरोधकांनी एकत्र येऊन सरकारविऊद्ध कितीही ओरड केली तरी जनता ही जनार्दन असल्याने तीच आमच्यासाठी सर्वकाही आहे. राज्याचा चौफेर विकास हा भाजपच्याच काळात झाला असल्याने जनतेचा भाजपवर विश्वास आहे. आमच्यासाठी जनता हीच देव आहे. जनतेचा आशीर्वाद कायमच भाजपच्या पाठिशी राहिलेला आहे, असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

Advertisement

Advertisement
Tags :

.