महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

ओप्पो देणार स्मार्टफोनमध्ये 100 पेक्षा अधिक एआययुक्त वैशिष्ट्यो

06:03 AM Jun 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

चीनी स्मार्टफोन निर्माती कंपनी ओप्पोने 2024 पर्यंत आपल्या सर्व स्मार्टफोनमध्ये 100 हून अधिक एआय (आर्टिफिशीयल इंटेलिजन्स)ची वैशिष्ट्यो देणार आहे. सदरची घोषणा कंपनीने बुधवारी केली आहे. याकरीता कंपनी आगामी काळात गूगल, मायक्रोसॉफ्ट आणि मीडियाटेक सारख्या कंपन्यांसोबत काम करणार आहे. यांच्या मदतीने स्मार्टफोन्समध्ये एआयची कार्यक्षमता वाढवण्यात येणार आहे. कॅमेरातील फोटोंना अधिक उत्तम बनवण्यात, भाषा समजून घेण्याच्या क्रियेकरीता व फोनची बॅटरी स्मार्ट पद्धतीने चार्ज करता येण्यासारख्या सुविधा ग्राहकांना नव्या एआययुक्त वैशिष्ठ्यांमुळे स्मार्टफोन्समध्ये उपभोगता येणार आहेत. प्रत्येकासाठी कंपनी एआययुक्त स्मार्टफोन आणण्याचा विचार करते आहे. याच अनुषंगाने आगामी काळात कंपनी सर्वाधिक स्मार्टफोन्समध्ये एआयची वैशिष्ठ्यो समाविष्ट करणार आहे. वर्षाच्या अखेरपर्यंत जवळपास 5 कोटी लोकांना या फिचर्सने युक्त स्मार्टफोन्सचा वापरकरता येणार आहे, असे कंपनीने म्हटले आहे. आगामी येणाऱ्या स्मार्टफोनमध्ये रायटर आणि रिकॉर्डिंगसारख्या सुविधा असतील. लिखाणाबाबतीत ग्राहकाला वाक्य पूर्ण करण्यासाठी, योग्य शब्द निवडण्यासाठी व व्याकरणसंबंधी सुधारणा करण्यासाठी नवे फिचर मदत करेल, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article