ओप्पो रेनोची 8 आवृत्ती बाजारात दाखल
07:00 AM Jul 21, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
सुरुवातीची किमत 29,999 रुपयापासून सुरु
Advertisement
नवी दिल्ली : ओप्पोने भारतीय बाजारात आपल्या 8 आवृत्तीचे स्मार्टफोन बाजारात दाखल केले आहेत. यामध्ये 8 आवृत्तीचे दोन मॉडेल बाजारात आणले आहेत. ज्यामध्ये रेनो 8 आणि रेनो 8 प्रो यांचा समावेश आहे. यासोबतच ओप्पोने भारतात आपला पहिला टॅबलेट ओप्पो पॅड एअर आणि ओप्पो एनको एक्स वायरलेस ईअरबड यांचेही सादरीकरण केले असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
Advertisement
ओप्पो रेनोची किंमत
रेनो 8 प्रो यांचे भारतात सादर करण्यात आलेल्या मॉडेलची किंमत ही 45,999 रुपये आहे, तर रेनो 8 8जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज असणाऱया मॉडेलची किंमत ही 29,999 रुपये आहे. रेनो 8 हा 19 जुलैपासून आणि रेनो 8 हा 25 जुलैपासून फ्लिपकार्टवर व ओप्पो स्टोअर आणि रिटेल आउटलेट्स यांच्याकडे उपलब्ध होणार आहे.
स्मार्टफोनमधील फिचर्स
- ओप्पो रेनो 8 प्रो 1080 पी रिझोल्यूशन व 120 एचझेड रिप्रेश रेट
- यासह 6.7 इंच आकाराचा अमोलेड डिस्प्ले
- फोनमध्ये मध्यभागी एक होल पंच कटआउट
- मीडियाटेक डायमेंशन 8100 मॅक्स चिप
- ट्रिपल कॅमेरा सेटअपसह 50 एमपी
- ग्लेझ्ड ग्रीन आणि ग्लेझ्ड ब्लॅक फिनिश आदी कलरमध्ये उपलब्ध
Advertisement
Next Article