भारतीय बाजारात ओप्पो रेनो 14 दाखल
50 एमपी सेल्फी कॅमेऱ्यांसह 6200 एमएएच क्षमतेची बॅटरी मिळणार
वृत्तसंस्था /मुंबई
चीनी टेक कंपनी ओप्पोने भारतीय बाजारात ओप्पो रेनो मालिका भारतीय बाजारात सादर केली आहे. या मालिकेत रेनो 14 आणि रेनो 14 प्रो हे दोन स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. ओप्पो रेनो 14 प्रो स्मार्टफोनमध्ये 6.83 इंचाचा अमोलेड डिस्प्ले, 50 मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा, मीडियाटेक डायमेंशन 8450 प्रोसेसर आणि 6200 एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. दोन्ही स्मार्टफोन दोन रंगांच्या पर्यायांमध्ये देण्यात आले आहेत. खरेदीदार ई-कॉमर्स वेबसाइट आणि कंपनीच्या वेबसाइटद्वारे हे दोन्ही स्मार्टफोन बुक करू शकतात. डिलिव्हरी 8 जुलैपासून सुरू होईल.
फीचर्स :
डिस्प्ले : या मालिकेतील बेस व्हर्जन म्हणजे रेनो 14 मध्ये 6.59 इंचाचा फुल एचडी अमोलेड डिस्प्ले आहे
प्रोसेसर आणि ऑपरेटिंग सिस्टम : याच वेळी, रेनो 14 प्रो मध्ये अँड्रॉइड 15 वर चालणारा मीडियाटेक डायमेंशन 8450 चिपसेट, परफॉर्मन्ससाठी कलर ओएस 15 आहे. रेनो 14 मध्ये कंपनीने मीडियाटेक डायमेंशन 8350 चिपसेट दिली आहे.
उंची, रुंदी :रेनो 14 प्रो ची उंची 16.34 सेमी, रुंदी 7.70 सेंमी आणि जाडी 0.75 सेंमी आहे.