ओप्पो के 13 टर्बो’मध्ये इन-बिल्ट फॅन मिळणार
ऑगस्टमध्ये के 13 टर्बो आणि के13 टर्बो प्रो 5 जी स्मार्टफोनचा समावेश राहणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ओप्पो ऑगस्टमध्ये भारतात त्यांची नवीन के13 टर्बो सिरीज लाँच करणार आहे. या सिरीजची कंपनी ओप्पो के13 टर्बो आणि के13 टर्बो प्रो हे दोन स्मार्टफोन लाँच करणार आहे. या फोनमध्ये इन-बिल्ट फॅन असेल. कंपनीचा दावा आहे की हा भारतातील पहिला स्मार्टफोन आहे ज्यात फोनमध्ये फॅक्टरी-फिटेड फॅन आहे.
हा फॅन प्रो-लेव्हल एअरफ्लो डक्ट सिस्टम आणि 7,000 मिमीऑ व्हेपर चेंबरच्या संयोजनासह येतो, ज्यामुळे गेमिंग किंवा जास्त वापर करतानाही फोन ओव्हरहीटिंगच्या समस्येपासून मुक्त होऊ शकतो. प्रोसेसर आणि परफॉर्मन्स के13 टर्बो प्रोला सामान्य प्रकारात स्नॅपड्रॅगन 8एस जेन 4 आणि मीडियाटेक डायमेन्सिटी 8450 चिपसेट मिळते. दोन्ही फोनमध्ये 7,000 एमएएच बॅटरी आणि 80 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल. दोन्ही फोनमध्ये 7,000एमएएच बॅटरी आणि 80डब्लू फास्ट चार्जिंग सपोर्ट राहणार आहे.
दोन्ही फोनमध्ये बॅटरी आणि 80 फास्ट चार्जिंग सपोर्ट
या स्मार्टफोनमध्ये 6.8 इंचाची क्रीन उपलब्ध असेल, जी थ्ऊझ्ए ध्थ्Dिं पॅनेलवर बनलेली आहे आणि 120एचझेड fिरफ्रेश रेटला सपोर्ट करते. क्रीनच्या संरक्षणासाठी यामध्ये ध्ज्ज्द चा क्रिस्टल शील्ड ग्लास बसवण्यात आला आहे. कंपनीने अद्याप त्याच्या किंमती जाहीर केलेल्या नाहीत. परंतु चिनी व्हेरिएंटच्या किमती पाहता,के 13 टर्बोची किंमत सुमारे 25,000 रुपये आणि के 13 टर्बो प्रो सुमारे 30,000 रुपये असू शकते.