ओप्पो फाइंड एक्स9 स्मार्टफोन लाँच
किंमत 74,999 रुपयांपासून : लुमोजी इमेज इंजिनसह 200 मेगापिक्सल कॅमेरा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
टेक कंपनी ओप्पोने भारतीय बाजारात त्यांची फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज फाइंड एक्स9 लाँच केली आहे. यामध्ये फाइंड एक्स9 आणि फाइंड एक्स9 प्रो मॉडेल्सचा समावेश आहे. हा भारतातील पहिला फोन आहे ज्यात मीडियाटेक डायमेंशन 9500 चिपसेट दिली आहे. याशिवाय, फाइंड एक्स9 प्रोमध्ये लुमोजीन इमेज इंजिनसह 200 मेगापिक्सल कॅमेरा सेटअप आणि दमदार 7500 एमएएच क्षमतेची बॅटरी अशी वैशिष्ट्यो आहेत. त्याच वेळी, फाइंड एक्स9 मॉडेलमध्ये 50 मेगापिक्सल कॅमेरा सेटअप आणि 7025 एमएएच बॅटरी अशी वैशिष्ट्यो आहेत. सदरचा नवा ओप्पोचा फोन भारतात व्हिवो एक्स300, वनप्लस 13 आणि शाओमी 17 सारख्या फ्लॅगशिप स्मार्टफोनशी स्पर्धा करेल. कंपनीने ओप्पो फाइंड एक्स9 दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे आणि त्याची किंमत 74,999 रुपये आहे. त्याचवेळी, ओप्पो फाइंड एक्स 9 प्रो हा एकाच स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे, ज्याची किंमत 1,09,999 रुपये आहे.
स्पेसिफिकेशन्स
- डिस्प्ले आणि डिझाइन : ओप्पो फाइंड एक्स 9 प्रो मध्ये 2772 ते 1272 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.78-इंच 2के अमोलेड क्रीन असेल. क्रीन गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 ने संरक्षित आहे.
- सॉफ्टवेअर आणि परफॉर्मन्स : हा फोन नवीन ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड 16 वर आधारित कलरओएस 16 वर चालतो. यात मीडियाटेकचा लेटेस्ट डायमेंशन 9500 प्रोसेसर आहे.
- बॅटरी आणि चार्जिंग : पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 7500 एमएएच सिलिकॉन-कार्बन बॅटरी आहे.
- सॉफ्टवेअर : फोनमध्ये मीडियाटेक डायमेंशन 9500 प्रोसेसर आहे, जो वेगवान आणि शक्तिशाली आहे.