महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

ओप्पो ए 59 स्मार्टफोन बाजारात

06:16 AM Dec 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

चीनी स्मार्टफोन निर्माती कंपनी ओप्पो यांनी आपला ओप्पो ए 59 हा नवा 5जी स्मार्टफोन नुकताच भारतीय बाजारात लाँच केला आहे. सदरच्या स्मार्टफोनची किंमत 15 हजार रुपयांपर्यंत असणार आहे. सदरचा स्मार्टफोन ओप्पोच्या ऑनलाईन स्टोअरवर, फ्लिपकार्ट व अॅमेझॉन इंडिया यांच्याकडे सोमवारपासून विक्रीकरिता उपलब्ध झाला आहे. देशातील निवडक रिटेल स्टोअर्सवर हा स्मार्टफोन विक्रीकिरता उपलब्ध करण्यात येणार आहे. ठराविक बँकांच्या कार्डमार्फत सदरचा नवा स्मार्टफोन खरेदी केल्यास ग्राहकांना जवळपास 1500 रुपयांपर्यंत सवलत प्राप्त करता येणार आहे. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोअरेजसह सिल्क गोल्ड आणि स्टारी ब्लॅक या दोन रंगामध्ये येणारा हा फोन 14999 रुपयांना ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. सदरचा स्मार्टफोन 6.56 इंचाच्या एचडी प्लस, एलसीडी डिस्प्लेसह येणार असून अँड्रॉईड 13 ऑपरेटिंग सिस्टीमसह या फोनची बॅटरी 5 हजार एमएएच क्षमतेची असेल.

Advertisement

फोनची वैशिष्ट्यो

6.56 इंच एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले, 90 हर्टस् रिफ्रेशरेट

मीडीयाटेक डायमनसिटी 6,020 ची चीप

अँड्रॉईड 13 ऑपरेटिंग सिस्टीम

13 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा

5000 एमएएचची बॅटरी

33 वॉटचा वेगवान चार्जर

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article