ओप्पो ए3 स्मार्टफोन भारतात दाखल
50 एमपी कॅमेऱ्यासह 5100 एमएएच बॅटरीची सुविधा
मुंबई :
दिग्गज टेक कंपनी ओप्पोने मध्यम बजेटमधील एक नवीन स्मार्टफोन ओप्पो ए 3 हा 5जीमध्ये सादर केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सल, मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर, 45 डब्ल्यू सुपरव्हूक चार्जिंग आणि 5100 एमएएच इतक्या क्षमतेच्या बॅटरीसोबत येणार आहे. ओप्पो ए3 5-जी स्मार्टफोन सिंगल स्टोरेज व दोन कलर पर्यायांसोबत उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. सदरच्या स्मार्टफोनची किंमत ही 15,999रुपये राहणार आहे. स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर आणि ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरुन फोन खरेदी करता येणार आहे.
भारतीय बाजरपेठेतील स्मार्टफोन वनप्लस नॉर्ड सीइ 3लाइट 5 जी, विवो वाय 5, इनफिनिक्स नोट 40 यांच्यासोबत व अलीकडेच सादर करण्यात आलेला ओप्पो ए3 प्रो या स्मार्टफोनची स्पर्धा राहणार आहे.
? डिस्प्ले : 120 एमझेड रिप्रेश
रेटसह 6.67 इंच डिस्प्ले
? कॅमेरा : एलइडी फ्लॅश लाइटसह 50 एमपी
? प्रोसेसर, ओएस : मीडीयाटेक डिमेन्स्टरी 6300 ऑक्टोकोर प्रोसेसर
? स्टोरेज : 6 जी रॅम व 128 जीबी