कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तेंडुलकरसह क्रीडापटूंकडून ‘ऑपरेशन सिंदूर’चे कौतुक

06:43 AM May 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

पाकिस्तानमधील दहशतवादी तळ नष्ट करणाऱ्या ‘ऑपरेशन सिंदूर’चे भारतातील क्रीडाक्षेत्राने कौतुक केले असून त्याचे नेतृत्व करताना सचिन तेंडुलकरने ‘एकतेत निर्भय, शक्तीत अमर्याद’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भारतीय सशस्त्र दलांनी बुधवारी पहाटे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ला केला,

Advertisement

‘एकतेत निर्भय, शक्तीत अमर्याद. भारताची ढाल त्याची जनता आहे. या जगात दहशतवादाला जागा नाही. आम्ही एक टीम आहोत. जय हिंद’, असे तेंडुलकरने ‘एक्स’वर पोस्ट केले आहे. माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, इरफान पठाण, सुरेश रैना आणि शिखर धवन यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पहलगाम हल्ल्याला भारताने दिलेल्या जोरदार प्रत्युत्तराचे कौतुक केले आहे. ‘अगर कोई आप पर पत्थर फेंके तो उसपर फूल फेंको, लेकिन गमले के साथ’ (जर कोणी तुमच्यावर दगडफेक केली तर फुलांनी उत्तर द्या, पण ती फुले लावलेल्या फुलदाण्यांसह), असे सेहवागने लिहिले आहे.

धवनने म्हटले आहे, ‘भारताने दहशतवादाविऊद्ध भूमिका घेतलेली आहे’. पठाण आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांनी ‘जय हिंद’ असे ट्विट केले आहे. ऑलिंपिक कांस्यपदक विजेता बॉक्सर विजेंदर सिंग आणि कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांनीही प्रत्युत्तर म्हणून या हल्ल्यांचे कौतुक केले आहे. ‘भारतमाता की जय’, असे विजेंदर लिहिले आहे, तर योगेश्वरने म्हटले आहे, ‘दहशतवादाविऊद्ध भारताची शून्य सहनशीलता !! जय हिंद, जय जवान’.

बुद्धिबळपटू विदिथ गुजरातीने पहलगामसारख्या क्रूर दहशतवादी हल्ल्यांना शिक्षा झाली पाहिजे, असे म्हटले आहे. ‘पहलगामवरील भयानक हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरने कडक प्रत्युत्तर दिल्याबद्दल मला आनंद आहे. दहशतवाद कधीही अनुत्तरित राहू नये आणि या ऑपरेशनचे नाव किती सुंदर आहे. भारतमाता की जय’, अशी प्रतिक्रिया गुजरातीने व्यक्त केली आहे.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article