कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘ऑपरेशन सिंदूर’ हे युद्धकौशल्याचे यश

06:39 AM Jul 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

संसदेतील चर्चेपूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा खुलासा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूरच्या ताकदीबद्दल मोठे विधान केले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी होण्यामागे केवळ ताकदच कारणीभूत नसून मजबूत रसद पुरवठ्याने आणि नव्या युद्धकौशल्यामुळे हे यश मिळविलेल्याचे प्रतिपादन संरक्षणमंत्र्यांनी केले आहे. गतिशक्ती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला व्हर्च्युअल पद्धतीने संबोधित करताना राजनाथ सिंह यांनी हा दावा केला आहे. ‘युद्धात विजय किंवा पराभव शस्त्रs नव्हे तर रसदच ठरवते’ असा धडा ऑपरेशन सिंदूरने जगाला दाखवून दिल्याचेही ते पुढे म्हणाले.

पाकिस्तानमधील दहशतवादी अ•dयांवर लक्ष ठेवून केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईत आवश्यक वस्तू वेळेवर पोहोचवण्यात आल्या आणि हेच खरे विजयाचे कारण बनले. आजच्या काळात युद्धे केवळ बंदुका आणि गोळ्यांनी जिंकली जात नाहीत तर रसद व माहिती वेळेवर पोहोचल्याने जिंकली जातात, असे संरक्षणमंत्री म्हणाले.

सशस्त्र दलांच्या वेगवेगळ्या शाखांसाठी रसद पुरविण्याची पद्धती वेगवेगळी असते. लष्करासाठी दुर्गम भागात शस्त्रs, इंधन, रेशन आणि औषधे पोहोचवणे हे आहे. तर नौदलासाठी जहाजांना सुटे भाग आणि उपकरणे पोहोचवणे हे काम आहे. हवाई दलासाठी जमिनीवरून आधार आणि सतत इंधन पुरवठा आवश्यक असतो. या तिन्ही दलांमध्ये रितसर ताळमेळ साधून मार्गक्रमण करावे लागते. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या बाबतीत हीच किमया साध्या करण्यात भारताला यश मिळाले असून सर्व यंत्रणांच्या सहकार्यातून शत्रूराष्ट्राविरोधातील मोठी मोहीम फत्ते करण्यात आल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article