शिरुर येथे ऑपरेशन गंगावळी सुरूच
सेनेकडून जीपीआर तंत्रानाचा वापर : सात मृतदेह हाती : आमदारांच्या कारला घेराव घालून विचारला जाब
कारवार : अंकोला तालुक्यातील शिरुर येथे ऑपरेशन गंगावळी सोमवारी सातव्या दिवशीही सुरूच ठेवण्यात आले. मातीच्या ढिगाऱ्याखाली गाढलेल्याना बोहर काढण्यासाठी रविवारी बेळगाव येथून 40 जवानांचा समावेश असलेले मिलिटरी पथक येथे दाखल झाले. सैनिकांच्या पथकाकडून ग्राऊंड पेनेट्रेटिंग रडारचा वापर करून लॉरी आणि लॉरी चालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रीय हमरस्त्यावरील दरडी हटविण्याचे आणि बेपत्ता लॉरी चालकाच्या शोधासाठी प्रशासनाला अपयश आले आहे. चालकांचा तोल सुटत चालला आहे. यामुळे अंकोला येथील लॉरी संघटनेने घटनास्थळी निदर्शने हाती घेण्यात आली. इतकेच नव्हे तर कारवार अंकोलाचे आमदार सतीश सैल यांच्या कारला घेराव घालून लॉरी संघटनेने शोध कार्यात विलंब का होत आहे, असा सवालही उपस्थित केला आहे.
सोमवारी अंकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेळसे येथे राष्ट्रीय हमरस्त्यावर घडली. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथकामधील जवानांनी सलग सात दिवस शोध कार्याला वाहून घेतल्यामुळे जवानांना थकवा जाणवणे साहजीकच आहे. रस्त्यावरील माती हटविण्यात बहुतेक यश आले असून आता नदीच्या काठावरील माती हटविण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. या दुर्घटनेनंतर सोमवारी अखेर सात मृतदेह हाती लागले आहेत. अद्याप केरळमधील लॉरी आणि लॉरी चालक अर्जुन (वय 29), स्थानिक जगन्नाथ नाईक (वय 61), उळूवरे येथील वृद्ध सीती गौडा (वय 64) आणि दुर्घटनेच्या आधी घटनास्थळी दिसून आलेल्या रोशन नाईक (वय 30) हे अद्याप बेपत्ता आहेत. या सर्वांचा शोध घेण्यासाठी आणि मातीचे ढिगारे हटविण्यासाठी बेळगाव येथून सैनिक धाऊन आले आहे.
चालक, क्लिनरना जेवण मिळत नसल्याने संभ्रम
सैनिकांच्याकडून ढिगाऱ्याखालील लॉरीचा शोध घेण्यात येत आहे. त्यासाठी ग्राऊंड पेनेट्रेटिंग रडारचा वापर करण्यात येत आहे. ही एक अशी यंत्रणा आहे जी दहा ते 15 मीटर मातीच्या ढिगाऱ्याखालील वस्तूंचा वेध घेते. रस्त्यावर दरड कोसळल्याने एकाच ठिकाणी सलग सात दिवस वाहने थांबून राहिल्याने वाहन चालकांचा तोल सुटत चालला आहे. चालक, क्लिनरना जेवण मिळत नसल्याने मोठी पंचाईत झाली आहे. त्यातच काही चालकांची प्रकृती बिघडल्याने संताप व्यक्त होत आहे. असून चालकांनी प्रशासनाच्या विरोधात आवाज उटविला. आमदारांच्या कारला घेराव घातला आणि विलंबाबद्दल आमदांना जाब विचारला.
बेपत्ता गंगावळी नदीतच राहिल्याची शक्यता
दिलासादायक बाब म्हणजे सोमवारी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर पावसाच्या प्रमाणात थोडी घट झाली आहे. गंगावळी नदीच्या पाण्याच्या पातळीतही घट झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एनडीआरएफ व एसडीआरएफ यांच्याकडून गंगावळी नदीच्या पात्रात वेगाने शोध मोहीम राबविण्यात येत आहे. कारण बेपत्ता झालेले गंगावळी नदीतच वाहून राहिल्याची अधिक शक्यता आहे.