महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ओपनएआय सह-संस्थापक सॅम ऑल्टमन बडतर्फ

06:37 AM Nov 19, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मीरा मुराती आता हंगामी सीईओ

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

ओपनएआय या कंपनीने सह-संस्थापक आणि सीईओ सॅम ऑल्टमन यांना कंपनीतून बडतर्फ करण्यात आले आहे. सॅम ऑल्टमन यांना गुगल मीटदरम्यान पदावरून पायउतार होण्यास सांगितले होते. ओपनएआयच्या मते त्याला पुढे नेण्याच्या ऑल्टमनच्या क्षमतेवर विश्वास नाही. तसेच आता कंपनीचे अध्यक्ष ग्रेग ब्रॅकमनही राजीनामा देणार असल्याचे समजते. सध्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) मीरा मुराती यांना अंतरिम किंवा हंगामी सीईओ बनवण्यात आले आहे.

ओपनएआय ही खासगी संशोधन प्रयोगशाळा असून त्यांच्याकडून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) विकसित होते. ऑल्टमन, टेस्लाचे सीईओ एलोन मस्क आणि इतर पाच जणांनी 2015 मध्ये ना-नफा संस्था म्हणून त्याची स्थापना केली होती. मस्क आता ओपनएआयच्या मंडळावर नाहीत. मायक्रोसॉफ्टनेही कंपनीत गुंतवणूक केली आहे.

सॅम ऑल्टमन यांनी ट्विट केल्यानंतर त्यांच्या सेवेतून मुक्त होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ‘मी ओपन एआयमध्ये घालवलेला वेळ मला खूप आवडला. मला कंपनीतील प्रतिभावान लोकांसोबत काम करताना सर्वात जास्त आनंद झाला आहे’ असे ट्विट ऑल्टमन यांनी केले आहे. मात्र, ओपनएआयचे अध्यक्ष आणि सह-संस्थापक ग्रेग ब्रॅकमन यांनी सॅम ऑल्टमन यांना कंपनीतून काढून टाकल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.

मीरा मुराती यांची ओळख

ओपनएआयमध्ये आता 34 वषीय मीरा मुराती हंगामी स्वरुपात सीईओपदाची धुरा सांभाळणार आहेत. त्यांचा जन्म अल्बेनियामध्ये झाला. त्या कॅनडामध्ये वाढल्या असून मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. त्यांनी टेस्लामध्येही काम केले आहे. मीरा मुराती यांनी चाटजीपीटी आणि डीएएलएल-ई सारख्या क्रांतिकारी उत्पादनांच्या विकासामध्ये पडद्यामागे काम केले आहे. 2022 मध्ये त्यांना मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणजेच सीटीओ पद बहाल करण्यात आले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article