For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पेडणेतील स्टेडियम खेळाडूंसाठी खुला करा!

12:05 PM Jun 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
पेडणेतील स्टेडियम खेळाडूंसाठी खुला करा
Advertisement

पेडणेतील क्रीडापटूंची मागणी : मोपा विमानतळाच्या सुरक्षा जवानांचे वास्तव्य, स्टेडियम असूनही खेळाडूंची होतेय कुचंबणा, नाराजीचा सूर 

Advertisement

पेडणे : सावळवाडा पेडणे येथील भाडेपट्टीवर दिलेला सरकारी इनडोअर स्टेडियम हा पेडणे तालुक्मयातील खेळाडूंसाठी खुला करावा, अशी मागणी पेडणे तालुक्यातील क्रीडापटूंनी केली आहे. तीन वर्षांपूर्वी सावळवाड पेडणे येथे तालुक्मयासाठी असलेल्या क्रीडा मैदानावर सरकारच्या क्रीडा खात्याने सुमारे 37 कोटी ऊपये खर्च करून इनडोअर स्टेडियम बांधला आहे. पेडणे मतदारसंघाचे तत्कालीन आमदार तथा गोवा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांच्या कार्यकाळात हा  स्टेडियम बांधण्यात आले आणि त्याच दरम्यान मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाला. या विमानतळावर सीआयएसएफ जे केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान आहेत. या जवानांना निवासासाठी  क्रीडा खात्याने हे स्टेडियमचा भाडेपट्टीवर दिले आहे. त्यामुळे पेडणे तालुक्यातील खेळाडूंची घोर निराशा झाली. याबाबत अनेकवेळा वृत्तपत्रातूनही आवाज उठविला होता. हा  स्टेडियम  पेडण्यातील खेळाडूंसाठी उपलब्ध करावा, अशी मागणी करूनही  सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले.

स्टेडियम पुन्हा करारावर देऊ नये!

Advertisement

आता हा करार आता संपुष्टात आला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यापुढे पुन्हा हे स्टेडियम करारावर देऊ नये, अशी मागणी होत आहे. पेडणे तालुक्मयातील अनेक खेळाडू  राष्ट्रीयस्तरावर पोहोचले आहेत. आणि अशा खेळाडूसाठी हे स्टेडियम महत्त्वाचे आहे. पेडणे तालुक्मयातील ज्या क्रीडा स्पर्धा होतात त्या आता म्हापसा येथे  होत असून खेळाडूंना म्हापसा येथे जावे लागते. शालेय विद्यार्थ्यांची त्यामुळे कुचंबणा होते. दरम्यान, हे स्टेडियम असा भाडेपट्टीवर देऊ नये. पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी याबाबत येत्या विधानसभेत या स्टेडियम पेडण्यातील खेळाडूंसाठी द्यावा यासाठी मागणी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय बर्डे यांनी केली आहे.

सरकारही भाडेपट्टीवर देणार काय ?

मुख्यमंत्र्यांनी पेडणे हे विकायला अदानींना काढले आहे का? असा प्रश्न संजय बर्डे यांनी करून पेडण्यातील सर्व जमिनी या दिल्लीकरांनी घेतलेल्या आहेत. हे स्टेडियमही खासगी कंपनीला भाडेपट्टीवर दिले आहे. सरकार मोठ मोठे प्रकल्प हे जनतेच्या पैशातून बांधून ते भाडेपट्टीवर देतात. मग सरकारही भाडेपट्टीवर देणार आहेत का? असा सवालही यावेळी संजय बर्डे यांनी उपस्थित केला.

Advertisement
Tags :

.