येथे केवळ चालते महिलांचे राज्य
पुरुषांसाठी आहेत कठोर नियम
जगभरात महिलांच्या सशक्तीकरणासाठी अनेक उपक्रम राबविले जात असतात. जगभरात आता महिलांच्या अधिकारांवरून जागरुकता वाढली असली तरीही अनेक देशांमध्ये अद्याप महिलांना पूर्ण स्वातंत्र्याने जगता येत नसल्याची वस्तुस्थिती आहे. परंतु एका देशात केवळ महिलाच राज्य करतात आणि सरकार चालवितात. या देशात पुरुष एकप्रकारे गुलाम आहेत.
मागील अनेक वर्षांपासून महिलांना समान अधिकार मिळवून देण्यावरून जगभरात चर्चा सुरू आहे. परंतु जगातील काही देशांमध्ये महिलांना प्रतिनिधित्व असून या महिला तेथे सरकार चालवत आहेत. चेक प्रजासत्ताकमधील अदर वर्ल्ड किंग्डमने स्वत:ला देश घोषित पेल आहे. तसेच याची राजधानी देखील असून याचे नाव ब्लॅक सिटी आहे. या देशाचा स्वत:चा ध्वज, चलन आणि पासपोर्ट देखील आहे. जगातील अन्य देशांनी अदर वर्ल्ड किंग्डमला एका देशाचा दर्जा दिला नसला तरीही तो स्वत:ला देश मानतो. स्वयंघोषित देशात नागरिकत्व केवळ महिलांनाच दिले जाते.
येथील महिलाच सरकार चालवितात आणि या देशाच्या महाराणीचे नाव पेट्रेसिया-1 आहे. येथे पुरुषांना केवळ गुलाम समजले जाते. या देशाच्या निर्मितीत दोन दशलक्ष डॉलर्सचा खर्च आल्याचे मानले जाते. या देशावरून प्रकाशित झालेल्या अहवालांनुसार पुरुषांना येथे गुलामाप्रमाणे वागविले जाते. येथे पुरुषच अनेक प्रकारची कामे करतात आणि महिलांची सेवा देखील करतात. या देशात राणीच्या परवानगीशिवाय पुरुष काहीच करू शकत नाहीत. एका महिलेकडे एक पुरुष नोकर असणे येथे अनिवार्य आहे. याचबरोबर येथे पुरुषांसाठी अनेक कठोर नियम आहेत. हा देश तीन हेक्टर म्हणजेच 7.4 एकरच्या भूभागावर वसलेला असून येथे अनेक इमारती आहेत. येथे 250 मीटरचा ओव्हल ट्रॅक, छोटा सरोवर आणि गवताळ मैदान आहे. राणीचे शासन येथूनच या देशावर चालते.