For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकसोबत केवळ पीओकेचा मुद्दा शिल्लक : जयशंकर

06:56 AM Sep 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाकसोबत केवळ पीओकेचा मुद्दा शिल्लक   जयशंकर
Advertisement

पाकिस्तान स्वत:च्या कर्माची फळं भोगतोय : संयुक्त राष्ट्रसंघ महासभेला केले संबोधित

Advertisement

वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ

भारतचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रसंघ महासभेला संबोधित करताना पाकिस्तानविषयी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. पाकिस्तानसोबतचा पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा आपल्याला सोडवायचा आहे. पाकिस्तानला पाकव्याप्त काश्मीर रिकामं करायला लावण्याचा मुद्दा अद्याप बाकी असल्याचे उद्गार जयशंकर यांनी काढले आहेत.

Advertisement

सीमेपलिकडे पाकिस्तान दहशतवादी धोरण राबवत आहे. मात्र पाकिस्तान यात कधीच यशस्वी होणार नाही. त्याच्या प्रत्येक कृतीचे परिणाम त्यालाच भोगावे लागणार आहेत. आजही पाकिस्तान स्वत:च्या कर्माची फळं भोगत असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील केवळ एकच मुद्दा सोडवणे बाकी आहे. हा मुद्दा पाकिस्तानने बेकायदेशीरपणे बळकावलेला काश्मीरचा भाग त्यांना रिकामा करायला लावण्याचा आहे. पीओके हा भारताचा भूभाग आहे. तसेच सीमेपलिकडून भारताच्या विरोधात असलेल्या दहशतवादी कारवायांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करायचा असल्याचे जयशंकर यांनी नमूद केले आहे.

पाकिस्तान स्वत:च्या कर्माची फळं भोगत आहे. पाकिस्तानचे कर्म आज त्याच्याच समाजाला गिळकृंत करत आहे. काही देश त्यांच्या नियंत्रणात नसलेल्या शक्तींमुळे किंवा परिस्थितीमुळे मागे राहिले आहेत. परंतु काही देश स्वत:च्या चुकांमुळे मागे राहिले. जाणूनबुजून चुकीचे निर्णय घेणे अशा देशासाठी घातक ठरले. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे आमचा शेजारी देश पाकिस्तान असल्याचे जयशंकर म्हणाले.

पाकिस्तानला परिणाम भोगावे लागणार

आम्ही शुक्रवारी संयुक्त राष्ट्रसंघ महासभेच्या व्यासपीठावरून काही चुकीच्या गोष्टी ऐकल्या, त्यामुळे मला भारताची भूमिका स्पष्ट करायची आहे. सीमेपलिकडील दहशतवादाचे पाकिस्तानचे धोरण कधीच यशस्वी होणार नाही, उलट याची शिक्षा पाकिस्तानला होईल. या शिक्षेपासून पाकिस्तान स्वत:चा बचाव करू शकणार नाही. स्वत:च्या कृतीचे परिणाम पाकिस्तानला भोगावेच लागतील असे ठाम प्रतिपादन जयशंकर यांनी केले आहे.

आता एकच मुद्दा सोडवणे बाकी

भारत आणि पाकिस्तानमध्ये आता केवळ एकच मुद्दा सोडवणे बाकी आहे. पाकिस्तानने बेकायदेशीरपणे भारताची भूमी बळकावली आहे. पाकिस्तानने बळकावलेला काश्मीरचा भाग मोकळा करावा. दहशतवादी संघटनांसोबतचे संबंध संपुष्टात आणावेत. दहशतवाद हा जगातील कोणत्याही समाजाच्या धर्मांच्या शिकवणीच्या विरोधात असल्याचे उद्गार विदेशमंत्र्यांनी काढले आहेत.

Advertisement
Tags :

.