कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काँग्रेसच करू शकतो भाजपला पराभूत

06:37 AM Apr 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गुजरातमध्ये राहुल गांधी यांचे वक्तव्य : कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केला उत्साह

Advertisement

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

Advertisement

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी गुजरातमध्sय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला आहे. गुजरातमध्ये पक्षाचे कार्यकर्ते हताश दिसून येत असले तरीही केवळ आमचा पक्षच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला पराभूत करू शकतो असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले आहे.

एका आठवड्यात गुजरातच्या स्वत:च्या दुसऱ्या दौऱ्यावर आलेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यावेळी संघ आणि भाजपवर निशाणा साधला आहे. काँग्रेस हार मानणार नाही, भाजपला पराभूत करण्यासाठी आम्ही दिवसरात्र झटणार आहोत. जे कार्यकर्ते बूथवर मजबूत आहेत, त्यांना आम्ही साथ देणार आहोत. गुजरातमधील भाजपचे 30 वर्षांचे शासन आम्ही संपुष्टात आणू असा दावा राहुल गांधी यांनी यावेळी केला आहे.

गुजरात (एकेकाळी काँग्रेसचा राहिलेला बालेकिल्ला) विरोधी पक्षांसाठी सर्वात महत्त्वपूर्ण राज्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पक्षसंघटनेला राज्यात नवे स्वरुप देण्यासाठी राहुल गांधी यांनी जिल्हा शाखांना मजबूत करण्याच्या एका प्रायोगिक योजनेची सुरुवात केल्यावर अरवल्ली जिल्ह्याच्या मोडासा शहरात बूथ स्तरीय र्कांग्रेस कार्यकर्त्यांना बुधवारी संबोधित केले. गुजरातमध्ये 2027 च्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे.

गुजरात हे काँग्रेससाठी सर्वात महत्त्वपूर्ण राज्य आहे. आम्ही गुजरातमध्ये हताश दिसत असलो तरीही भाजपला येथे पराभूत करणार आहोत. भाजपला पराभूत करणे अवघड नाही हे सांगण्यासाठी मी येथे आलो आहे. आम्ही निश्चितपणे हे करून दाखवू. केवळ काँग्रेस पक्षच संघ आणि भाजपला पराभूत करू शकतो असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

Advertisement
Next Article