वीज पुरवठा कंपन्यांच्या ऑनलाईन सेवा 24,25 रोजी बंद
बेंगळूर : माहिती तंत्रज्ञान (आयटी) व्यवस्थेतील तातडीच्या दुरुस्ती कामांमुळे राज्यातील पाच वीज पुरवठा कंपन्यांच्या (एस्कॉम) कार्यक्षेत्रातील वीज भरणा, नावात बदल, जकात बदल आणि नवीन कनेक्शन या ऑनलाईन सेवा 24 ऑक्टोबर रोजी रात्री 8 ते 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत शहरी भागात उपलब्ध राहणार नाहीत. बेस्कॉम, सेस्क, हेस्कॉम, मेस्कॉम, जेस्कॉम या पाच वीज वितरण कंपन्यांच्या कार्यक्षेत्रात बुधवार सकाळपासून गुरुवारी दुपारपर्यंत ऑनलाईन सेवा बंद राहणार आहेत. या काळात ऑनलाईन वीज भरण्याची बेस्कॉम मित्र अॅप, बेंगळूर वन, कर्नाटक वन यासह थर्ड पार्टी वीज बिले भरणा सेवा बंद राहणार आहेत. हेस्कॉम कार्यक्षेत्रात बेळगाव, निपाणी, चिकोडी, अथणी, गोकाक, जमखंडी, बैलहेंगल, सौंदत्ती, मुधोळ, कारवार, दांडेली, भटकळ, हुबळी-धारवाड, लक्ष्मेश्वर, गुळेदगुड्ड, गदग, महालिंगपूर, इंडी, सेवनूर, शिरसी, कुमठा, बागलकोट, रबकवी-बनहट्टी, इळकल, राणेबेन्नूर, विजापूर शह या उपविभागांमध्ये हेस्कॉमच्या ऑनलाईन सेवा उपलब्ध राहणार नाहीत.