Solapur : सोलापूरमध्ये शेअर मार्केटच्या आमिषाने 2 कोटींची ऑनलाईन फसवणूक
एसबीआय सिक्युरिटीच्या नावाखाली २ कोटींहून अधिकची फसवणूक
सोलापूर : शेअर मार्केटमध्ये रक्कम गुंतवणूक करून झालेला नफा न देता टाळाटाळ करून दोन कोटी २८ हजार ११ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. ही घटना ३१ ऑगस्ट २०२५ पासून ते आजतागायत ऑनलाईन स्वरुपात घडली.याप्रकरणी अनिल गोविंद श्रीगोंदेकर (वय ६८, रा. बालाजी हौसिंग सोसायटी जवळ, होटगी रोड, सोलापूर) यांनी संबंधितावर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी श्रीगोंदेकर हे त्यांच्या राहत्या घरी असताना त्यांना विविध पाच मोबाईल कुमांकावर एसबीआय सिक्युरिटी अॅप्लिकेशन तसेच एसबीआय सिक्युरिटीज ग्रुप या नावाचे व्हॉट्सअॅपच्या ग्रुप अॅडमिनने फिर्यादी यांच्या आयसीआयसीआय बैंक खात्यावर चार लाख २४ हजार ७०० अदा करणारे बैंक अकाऊंट फिर्यादी यांना सादर केलेले बेनिफिशीअरी बैंक अकाऊंट होल्डरचा वापर करून फिर्यादी यांना शेअर मार्केटमध्ये नफा मिळत असल्याचे भासवले.
यात सुरुवातीला फिर्यादी यांना काही प्रमाणात नफा दिला. त्यानंतर फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यानंतर झालेल्या नफ्यासाठी फिर्यादी यांनी रक्कम विड्रॉलचा प्रयत्न केला असता यातील आरोपी यांनी या ना त्या कारणाने पैसे देण्यास टाळाटाळ केली. यात फिर्यादी यांची दोन कोटी २८ लाख ११ हजार रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणुक केली. पोलीस निरीक्षक गजा तपास करत आहेत.