कांदा भाव स्थिर : इंदोर बटाटा दरात 200 ची वाढ
भाजीमार्केटमध्ये भाजीपाल्यांचे दरही स्थिर-टोमॅटो, कोथिंबीरसह मोजक्या भाजीपाल्यांचे दर किंचित कमी
सुधीर गडकरी / अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात कांदा भाव प्रतिक्विंटल स्थिर झाला. तर इंदोर बटाटा क्विंटलला 200 रुपयांनी वाढला. बेळगाव जवारी बटाट्याचा भाव क्विंटलला दोनशे रुपयांनी घसरला. रताळी व गुळाचा भाव प्रतिक्विंटल स्थिर झाला. भाजीमार्केटमध्ये भाजीपाल्यांचे दरही स्थिर आहेत. टोमॅटो व कोथिंबीरसह काही मोजक्या भाजीपाल्यांचे दर किंचित प्रमाणात. कमी झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. मात्र किरकोळ बाजारात वाढीव दरानेच भाजीविक्री सुरू आहे.
बेळगाव एपीएमसीमध्ये शनिवारी परराज्यातील इंदोर बटाट्याच्या आठ ट्रक व तळेगाव बटाट्याच्या दोन आणि डीसा बटाट्याच्या 12 ट्रका मार्केट यार्डमध्ये विक्रीसाठी आला होता. तर महाराष्ट्र कांद्याच्या सुमारे 70 ट्रका, कर्नाटक कांद्याच्या 15 ट्रका आणि पांढऱ्या कांद्याच्या 5 असे एकूण 90 ट्रक कांदा विक्रीसाठी मार्केट यार्डमध्ये आला होता. आणि महाराष्ट्र कांद्याचा दर 1200 ते 2000, कर्नाटक कांदा 1000 ते 1700 आणि पांढऱ्या कांद्याचा दर 1000 पासून 1500 रुपये भाव झाला व इंदोर बटाटा भाव 2000 पासून 2400 आणि तळेगाव बटाटा भाव 1500 पासून 2000 व डिसा बटाटा भाव 1400 ते 1700 रुपये झाला असल्याची संपूर्ण माहिती व्यापारी महेश कुगजी यांनी दिली.
बेळगाव तालुक्यातील जवारी बटाट्याच्या सुमारे 2000 पिशव्या आवक विक्रीसाठी आली होती. आणि रताळ्याची सुमारे 900 पिशव्या आवक आली होती. यावेळी लाल जवारी बटाट्याचा भाव 500 पासून ते 2500 रुपये व पांढऱ्या बटाट्याचा भाव 500 पासून ते 2300 रुपये क्विंटल झाला आहे आणि रताळ्याचा दर 1600 पासून 2200 रुपये भाव झाला असल्याची माहिती अडत व्यापारी हेमंत पाटील यांनी दिली.
जवारी बटाटा दरात दोनशे रुपयांनी कमी
सध्या तालुक्यामध्ये जवारी बटाटा काढणीला सर्वत्र सुरुवात झाली असून आवक देखील हळूहळू वाढ होऊ लागली आहे. त्याचप्रमाणे मागणीदेखील वाढत आहे. गोवा व कोकण पट्ट्याला जवारी पांढरा बटाटा मागणी असते व तालुक्यासह इतर किरकोळ बाजारात लाल बटाट्याला मागणी असते. मात्र शनिवारी परराज्यातील डिसा बटाट्याचा दर कमी झाल्याने किरकोळ खरेदीदार आणि हॉटेल खरेदीदार डिसा बटाटा खरेदीदारांना 1200 ते 1700 रुपये क्विंटल मिळू लागला. त्यामुळे जवारी बटाट्याला खरेदीदार कमी झाल्याने जवारी बटाट्याचा भाव क्विंटलला दोनशे रुपयांनी कमी झाला, अशी माहिती बटाटा अडत व्यापाऱ्याने ‘तऊण भारत’ला दिली.
इंदोर बटाटा दरात दोनशे रुपयांनी वाढ
इंदोरमध्ये सध्या शीतगृहामध्ये बटाटा मोठ्या प्रमाणात साठवणूक करून ठेवण्यात आला आहे. डिसेंबर महिन्यापासून आतापर्यंत शेतवडीतील बटाटा मागणीनुसार देशातील विविध बाजारात पाठवत होते. सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे पुढील डिसेंबरपर्यंत बटाटा साठवून ठेवणे गरजेचे असल्याने इंदोरमधील व्यापारी शीतगृहांमध्ये गेल्या महिन्यापासून साठवून ठेवत आहेत व येत्या डिसेंबरपर्यंत हाच बटाटा बाजारपेठेत मागणीनुसार पाठवतात. सध्या इंदोरमध्येच बटाट्याचा दर जाग्यावरच वाढला आहे व इतर ठिकाणी देखील बटाट्याची टंचाई निर्माण झाल्याने साहजिकच बटाटा दरात वाढ झाली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम थेट बेळगाव बाजारपेठेवर देखील झाला असून इंदोर बटाट्याचा दर क्विंटलला दोनशे ऊपयांनी वाढला आहे. त्याचा भाव 2200 ते 2400 ऊपये सध्या भाव झाला आहे, अशी माहिती इंदोर बटाटा अडत व्यापाऱ्याने दिली.
कांदा दर स्थिर
महाराष्ट्रातून देशभरासह बेळगावमध्ये देखील कांदा आवक विक्रीसाठी येत आहे. शनिवारच्या बाजारात महाराष्ट्रातील सुमारे 70 ट्रक कांदा विक्रीसाठी दाखल झाला होता. सध्या कांदा वाळलेला व मीडियम, मोठवड, गोळा आकाराचा उत्तम दर्जाचा कांदा विक्रीसाठी येत आहे. त्यातच कर्नाटकातील कांदादेखील विक्रीसाठी येत आहे. कांद्याला सर्वत्र मागणी आहे. मात्र गेल्या आठवड्यापासून कांदा दर स्थिर आहे. हा कांदा वर्षभर टिकतो व खाण्यासाठी देखील चवदार असतो. यामध्ये नासाडी होत नाही. त्यामुळेच किरकोळ खरेदीदारासह घरगुती खरेदीदार या महिन्यात कांदा खरेदीसाठी मार्केट यार्डमध्ये गर्दी वाढू लागली आहे. तर दैनंदिन प्रमाणे गोळा व मिडीयम कांद्याला स्थानिक खरेदीदारांसह गोवा व कोकणपट्टा बेळगाव जिह्यातील खरेदीदार महाराष्ट्र कांदा खरेदी करणे पसंत करत आहेत. त्यामुळे सध्या महाराष्ट्र कांद्याचा भाव टिकून आहे, अशी माहिती कांदा अडत व्यापाऱ्याने दिले
रताळी दर स्थिर
सध्या तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यातील रताळी काढणीला सुऊवात झाली असून आवकेत देखील हळूहळू वाढ होत चालली आहे. रताळी स्थानिक खरेदीदारच खरेदी करत आहेत. काही ठिकाणी चुकूनच परजिह्यामध्ये जात आहेत. सध्याची रताळी उन्हाळी असल्याने खाण्यासाठी देखील ती चवदार असतात. म्हणून बेळगाव जिह्यातील ठिकठिकाणांचे खरेदीदार रताळी खरेदी करीत आहेत. सध्या मार्केट यार्डमध्ये बारा महिने देखील रताळी आवक येत आहे. त्यामुळे रताळ्याची कमतरताच भासत नाही व सध्या रताळ्याचा दर स्थिर असल्याची माहिती रताळी व्यापाऱ्याने दिले.
पांढऱ्या कांद्याची मागणी मंदावली
पूर्वी लाल कांद्यापेक्षा पांढरा कांद्यालाच जादा महत्त्व देत होते. त्यामुळे पांढऱ्या कांद्याचा दरात कायम वाढ होत होती. मात्र हळूहळू कालांतराने पांढऱ्या कांद्यापेक्षा लाल कांद्यालाच मोठ्या प्रमाणात जनतेतून मागणी वाढू लागली. काही ठराविक नागरिकच पांढरा कांदा वापरतात. अन्यथा सर्रास लाल कांदा घरगुती जेवणापासून ते मोठमोठ्या हॉटेलमध्ये देखील लाल कांदा वापरतात. सध्या उन्हाळा सुरू असल्याने तालुक्यामध्ये मिरची कांडप करून तिखट बनवण्यात शहरासह तालुक्यामधील ग्रामस्थ व्यस्त आहेत. केवळ तिखट बनवण्यासाठी पांढरा कांदा वापरण्यात येतो. तरीदेखील पांढऱ्या कांद्याला सध्या क्विंटलला 1200 पासून ते 1500 ऊपये भाव आहे, अशी माहिती पांढरा कांदा व्यापाऱ्याने दिली.
भाजीपाल्यांचे दर स्थिर
सध्या गेल्या दोन महिन्यापासून भाजीपाल्यांच्या दरात स्थिरता आहे. टोमॅटो व कोथिंबीर, भेंडी, बीट, कोबी, फ्लॉवर व कांदा पात व काही हिरव्या भाजीपाल्याच्या दरात किंचित प्रमाणात घट झाली आहे. इतर भाजीपाल्यांचे दर टिकूनच आहेत. यामुळे भाजी उत्पादक शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. दोन-तीन महिने काबाडकष्ट करून उत्पादन घेतलेल्या भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. तर दुसरीकडे किरकोळ खरेदीदार वाढीव दरानेच भाजीविक्री करीत आहेत, अशी माहिती शेतकरी वर्गाने दिली.