For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कांदा, बटाटा, रताळी भाव प्रति क्विंटलला स्थिर

06:02 AM Dec 31, 2023 IST | Tarun Bharat Portal
कांदा  बटाटा  रताळी भाव प्रति क्विंटलला स्थिर
Advertisement

जवारी बटाटा भाव क्विंटलला 200 तर इंदोर बटाटा भाव 300 रुपयांनी वाढला : भाजीपाल्यांच्या दरात वाढ 

Advertisement

सुधीर गडकरी/ अगसगे

बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात कांदा, बटाटा, रताळी यांचा भाव प्रति क्विंटलला स्थिर आहे. तर पांढऱ्या कांद्याचा भाव कमी झाला आहे. तसेच बेळगाव जवारी बटाटा भाव क्विंटलला 200 रुपयांनी वाढला आहे. जुना इंदोर बटाटा भाव क्विंटलला 300 रुपयांनी वाढला आहे. नवीन इंदौर बटाट्याचा भाव स्थिर आहे. आग्रा, तळेगाव बटाटा भावदेखील स्थिर आहे. भाजीमार्केटमध्ये काही भाजीपाल्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने गोवा, कोकणपट्टा येथील खरेदीदार चढ्या भावाने भाजीपाला खरेदी करीत आहेत. तर मोजक्या काहीच भाजीपाल्यांचे दर स्थिर आहेत. वांगी भेंडी, टोमॅटो, बिन्स, गवार, गोल भोपळा, शेवगा शेंगा, बिट, काकडी, पालक आदी भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाली आहे. तर लिंबू दरात घसरण झाली आहे.

Advertisement

गेल्या आठ दिवसांपासून महाराष्ट्र कांदा, कर्नाटक कांदा भाव स्थिर आहे. तर नवीन इंदौर बटाटा भाव स्थिर आहे. आग्रा, तळेगाव बटाटा भाव देखील स्थिर आहे. कर्नाटक कांदा भाव 1000 ते 2500 रुपये झाला. तर महाराष्ट्र कांदा भाव 1000 ते 2500 रुपये झाला. आग्रा बटाटा भाव 1000 ते 1700 रुपये, तळेगाव बटाटा भाव 600 ते 2000 रुपये, जुना इंदौर बटाटा भाव 1500 ते 2400 रुपये, नवीन इंदौर बटाटा भाव 1000 ते 1800 रुपये, पांढऱ्या कांद्याचा भाव 800 ते 2200 रुपये झाला आहे. बेळगाव जवारी बटाटा भाव 1300 ते 3000 रुपये झाला आहे. कांदा-बटाटा भाव स्थिर असला तरी भाजीपाल्यांचे दर वाढल्याने पुन्हा सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागत असून गृहिणींच्या आर्थिक बजेटवर परिणाम होत आहे.

 नवीन इंदोर बटाटा भाव स्थिर

सध्या मार्केट यार्डमध्येच जुना इंदोर बटाटा येत नसून इंदोरमध्ये शितगृहातील जुना बटाटा जवळपास संपला आहे. शनिवारी मार्केट यार्डमध्ये जुना बटाटा केवळ एक ट्रक आला होता. नवीन इंदोर बटाटा सुरुवात होऊन एक महिना झाला आहे. नवीन इंदोर बटाटा सध्या कचवड येत आहे. पाकड बटाटा येण्यास अद्याप पंधरा-वीस दिवस लागणार आहे. सध्या नवीन इंदोर बटाटा भाव 1000 ते 1800 रुपये आहे. भाव टिकून आहे, अशी माहिती बटाटा व्यापाऱ्यांनी दिली.

भाजीपाल्याच्या दरात वाढ

घटप्रभा परिसरातील भाजीपाल्यांच्या आवकेत घट निर्माण झाली आहे. यामुळे काही भाजीपाला परराज्यातून भाजीमार्केटमध्ये विक्रीसाठी येत आहे. बेळगाव, खानापूर तालुक्यातील भाजीपाला आवक भाजीमार्केटमध्ये येत आहे. गोवा, कोकणपट्टा आदी भागामध्ये बेळगाव भाजीमार्केटमधून उत्तम दर्जाचा भाजीपाला गोवा खरेदीदार खरेदी करतात. इतर भाजीपाला इतर खरेदीदार खरेदी करतात. सध्या भाजीमार्केटमध्ये भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. गोल भोपळा, वांगी, टोमॅटो, भेंडी, मेथी, शेपू, पालक आदी भाजीपाल्याचा दर वाढला आहे. काही मोजक्या भाजीपाल्याचा भाव स्थिर आहे, अशी माहिती भाजी व्यापाऱ्यांनी दिली.

Advertisement
Tags :

.