कांदा 200 रुपयांनी वधारला, इंदोर-आग्रा बटाटा भाव स्थिर
मुसळधार पावसामुळे रताळी आवकच नाही : गुळाचा भाव स्थिर : टोमॅटो ट्रेच्या दरात घसरण
सुधीर गडकरी / अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात कांदा भाव प्रति क्विंटलला 200 रुपयांनी वधारला तर इंदोर बटाटा व आग्रा बटाटा भाव क्विंटलला स्थिर आहे. गेल्या 8-10 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रताळी आवकच बाजारात दाखल झाली नाही. तर गुळाचा भाव स्थिर आहे. भाजीमार्केटमध्ये टोमॅटो ट्रेच्या दरात घसरण झाली आहे. काही भाजीपाल्यांच्या दरात किंचित वाढ झाली आहे. तर कोथिंबीर आणि इतर काही मोजक्या भाजीपाल्यांचे दर मात्र स्थिर आहेत. भाजीपाल्यांचे दर आटोक्यात आल्याने सर्वसामान्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. कारण गोवा व कोकणपट्ट्यामधून पावसामुळे मागणीत घट निर्माण झाल्याने भाजीपाला दर आटोक्यात आले आहेत.
मागील शनिवार दि. 20 रोजीच्या एपीएमसीच्या बाजारात कांदा भाव प्रति क्विंटलला 2000 पासून ते 3300 रुपये होता. तर आग्रा बटाटा 2500 पासून 2950, इंदोर बटाटा देखील 2700 पासून 3250, पांढरा कांदा भाव 1500 पासून 3400 रुपये होता. हे दर गेल्या एक महिन्यापासून टिकून होते. तसेच बुधवार दि. 24 रोजी महाराष्ट्र कांदा भाव क्विंटलला 2000 ते 3250, कर्नाटक कांदा भाव 2000 ते 3150 रुपये, आग्रा बटाटा 2700 ते 2900, इंदोर बटाटा 3000 ते 3250 रुपये, पांढरा कांदा 2000 ते 3350 रुपये होता. गुळाचा भाव मात्र स्थिर होता.
कांदा 200 रुपयांनी वधारला
महाराष्ट्रामध्ये गेल्या 8-10 दिवसांपासून सातत्याने मुसळधार पाऊस पडून संपूर्ण पिके पाण्याखाली गेली आहेत. तर शेतवाडीला जाणारे रस्ते देखील बंद झाले आहेत. यामुळे शनिवारी महाराष्ट्रातून बेळगाव मार्केट यार्डला कांद्याची आवक कमी प्रमाणात विक्रीसाठी दाखल झाली होती. काही ठराविक कांदा अडत दुकानदारांकडे कांदा आवक होती. मागणी मात्र नेहमीप्रमाणे होती. यामुळे कांदा सवालामध्ये कांदा भाव-गोळी 2000 ते 2800 रु., मीडियम 3000 ते 3100 रु., मोठवड 3300 ते 3400 रु. व गोळा 3400 ते 3550 रु. झाला. सध्या महाराष्ट्रामध्ये असाच पाऊस पडल्यास कांदा दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. बेळगाव मार्केट हे महाराष्ट्र कांद्यावर 70 टक्के अवलंबून असते. खरेदीदार देखील महाराष्ट्र कांद्याला खरेदी करण्यात पसंद करतात, अशी माहिती अडत व्यापाऱ्यांनी दिली.
रताळी आवक ठप्प
बेळगाव तालुक्यामध्ये गेल्या 15 दिवसांपासून सतत निरंतर मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे शेतवाडीला जाणेदेखील मुश्किल बनले आहे. रताळ्याच्या राशी शेतामध्ये पाणी लागू नये म्हणून व्यवस्थित ढिगा मारुन साठवून ठेवले आहे. मात्र रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल तर झाला आहे. त्यातच रताळी निवडून पोत्यामध्ये भरणेदेखील पावसामुळे मुश्किल झाल्याने मागील शनिवार दि. 20 रोजी आणि आजच्या बाजारात देखील एक पिशवी देखील रताळी विक्रीसाठी मार्केट यार्डला आवक आली नाही. सध्या पावसामध्ये बेळगावसह महाराष्ट्रामध्ये रताळी भाजून व उकडून खाण्यासाठी मागणी मोठ्या प्रमाणात असते. सध्या रताळ्याला मागणी आहे. मात्र रताळीच नसल्यामुळे खरेदीदारांना खाली हात परतावे लागत आहे, अशी माहिती रताळी व्यापाऱ्याने दिली.
आग्रा-इंदोर बटाटा भाव स्थिर
आग्रा व इंदोरमध्ये शितगृहामध्ये साठवून ठेवलेला बटाटा विक्रीसाठी एप्रिल, मे महिन्यापासून येत आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत शितगृहातील इंदोर बटाटा बाजारात विक्रीसाठी येतो. त्यानंतर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीला नवीन इंदोर बटाटा विक्रीसाठी प्रारंभ होतो. प्रथमत: बटाटा कचवड व माती लागलेला येतो. त्यानंतर थोड्या प्रमाणात पाकड बटाटा व फेब्रुवारी-मार्चनंतर चांगल्या दर्जाचा बटाटा विक्रीसाठी येण्यास प्रारंभ होतो. त्यावेळी इंदोरमधील तेजी-मंदीचे खरेदीदार इंदोरमध्ये शेतकऱ्यांकडून शेतामध्येच बटाट्याच्या राशी खरेदी करून शितगृहामध्ये साठवून ठेवतात. आणि मागणीनुसार इंतर राज्यांमध्ये विक्रीसाठी पाठवतात, अशी माहिती बटाटा व्यापाऱ्यांनी दिली.
टोमॅटो दरात घसरण, कोथिंबीर स्थिर
गेल्या 15-20 दिवसांपूर्वी भाजीपाला दर भडकले होते. मात्र मुसळधार पाऊस सतत पडत आहे. गोवा आणि कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे भाजीपाला मागणीत घट निर्माण झाली. यामुळे बेळगाव भाजीमार्केटमध्ये भाजीपाला दर घसरले. 8-10 दिवसांपूर्वी टोमॅटोची आवक कमी झाल्याने टोमॅटो ट्रेचा भाव शनिवार दि. 20 रोजी 1200 ते 1400 रु. झाला होता. तर शनिवार दि. 27 रोजी टोमॅटो ट्रेचा भाव 700 ते 800 रु. झाला आहे. कारण टोमॅटो आवकेत वाढ झाली आहे. पाऊस जास्त असल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांसह गोवा, कारवार, कोकणातील मोठमोठे खरेदीदार देखील आवश्यकतेपुरते तेवढेच भाजीपाला खरेदी करीत आहेत. नाहीतर भाजीपाला