महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कांदा-आग्रा-तळेगाव बटाटा भाव स्थिर

06:02 AM Feb 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

 भाजीपाल्याच्या आवकेत समतोल असल्यामुळे भाजीपाला दर स्थिर : रताळी दरात 150 रुपयानी वाढ

Advertisement

सुधीर गडकरी/ अगसगे

Advertisement

बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात बेळगाव जवारी बटाटा आवक येण्यास प्रारंभ झाला आहे. इंदोर बटाटा भाव प्रति क्विंटलला 200 रुपयांनी वधारला आहे. तर रताळी भाव 150 रुपयांनी वाढला आहे. आग्रा बटाटा, तळेगाव बटाटा यांचा भाव प्रति क्विंटलला स्थिर आहे. कांद्याचा भाव क्विंटलला स्थिर आहे. भाजीमार्केटमध्ये भाजीपाल्याच्या आवकेत समतोल असल्यामुळे भाजीपाला दर स्थिर आहे.

सध्या बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील काही गावांमधील बेळगाव जवारी बटाटा काढणीला प्रारंभ झाला आहे. यामुळे गेल्या आठ दिवसापासून मार्केट यार्डमध्ये जवारी बटाटा विक्रीसाठी येत आहे. महाशिवरात्रीनंतर जवारी बटाट्याची आवक मोठ्या प्रमाणात येणार आहे. शनिवारी जवारी बटाटा भाव क्विंटलला 800 ते 2600 रुपये झाला असल्याची माहिती अडत व्यापाऱ्यांनी दिली.

मागील शनिवारी व बुधवारचा भाव मागील आठवड्यात शनिवार दि. 3 रोजी एपीएमसीमध्ये कांद्याच्या आवकेत घट निर्माण झाल्याने कांदा दरात 300 रुपयांनी वाढ झाली होती. यावेळी कांदा भाव प्रति क्विंटल 1000 ते 2200 रुपये, आग्रा बटाटा भाव 1300 ते 1800 रुपये, तळेगाव बटाटा भाव 1300 ते 1800 रुपये, बेळगाव बटाटा भाव 600 ते 2600 रुपये, इंदोर बटाटा भाव 1000 ते 1800 रुपये झाला होता. तर बुधवारच्या बाजारात मार्केट यार्डमध्ये कांदा आवकेत वाढ झाल्यामुळे कांदा दरात 300 रुपयांनी घट निर्माण झाली आणि कांदा भाव पूर्वपदावर येऊन पोहोचला. यावेळी कांदा भाव 1000 ते 1800 रु. झाला. इंदोर बटाटा 1000 ते 1850 रु., तळेगाव बटाटा 1000 ते 1800 रु., आग्रा बटाटा 1000 ते 1650 रु. झाला. रताळी भाव 350 ते 800 रुपये झाला होता.

शनिवार दि. 10 रोजीचा भाव

कांद्याच्या आवकेत समानता असल्यामुळे आजच्या बाजारात कांदा दर लिलावामध्ये स्थिर झाला. यावेळी कांदा भाव 800 ते 1800 रुपये, इंदोर बटाटा 1000 ते 2000 रु., आग्रा बटाटा 1200 ते 1750 रु., तळेगाव बटाटा 1300 ते 1850 रुपये झाला. रताळी 400 ते 800 रु., बेळगाव जवारी बटाटा 800 ते 2600 रु. क्विंटल भाव झाले आहेत.

इंदोर बटाटा भाव 200 रुपयांनी वाढ

इंदोरमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये बटाटा काढणीला सुरुवात झाली होती. यावेळी बटाटा कचवड येत होता. यावेळी 800 ते 1200 रु. भाव होता. सध्या त्या ठिकाणचे तेजी-मंदीचे व्यापारी इंदोर बटाटा टप्प्याटप्प्याने शितगृहामध्ये साठवून ठेवण्यात येत आहेत. सध्या बटाटा पाकड येत आहे. विविध बाजारात इंदोर बटाटा आवक विक्रीसाठी जात असून बटाटा दरात क्विंटलला 200 रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती बटाटा व्यापाऱ्यांनी दिली.

कांदा भाव स्थिर

सध्या देशभरामध्ये विविध ठिकाणी महाराष्ट्रातूनच कांदा आवक जात आहे. सध्या कांदा पहिल्या टप्प्यातील येत आहे. केंद्र सरकारने मार्च अखेरपर्यंत परदेशामध्ये निर्यातीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. यामुळे स्थानिक बाजारावर कांद्याचा भाव टिकून असतो. सध्या कांदा उत्तम दर्जाचा येत आहे. या कांद्याला म्हणावी तशी मागणी नसल्यामुळे कांदा भाव स्थिर आहे. शनिवारी कांदा भाव 800 ते 1800 रुपये झाला असल्याची माहिती कांदा व्यापाऱ्याने दिली.

रताळी मागणीत घट

यंदा रताळ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले आहे. रताळ्याला दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, पुणा, मुंबई, आदी ठिकाणी केवळ थंडीच्या काळात मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र दिल्ली, मुंबईला ऊन सुरू झाल्याने रताळ्याला मागणी कमी झाली आहे. त्यातच रताळ्याला परराज्यामध्ये मागणी असते. उन्हाळा सुरू झाल्यामुळे रताळ्याला मागणी कमी असते. यामुळे रताळी दरात वाढ झाली नाही, अशी माहिती रताळी व्यापाऱ्यांनी दिली.

भाजीपाला भाव स्थिर

सध्या केवळ बेळगाव परिसरातील भाजीपाला आवक भाजीमार्केटमध्ये येत आहे. उत्तम दर्जाच्या भाजीपाल्यांना गोवा, कोकणपट्टा परिसरात मागणी असते. आणि भाजीपाल्याचे दर स्थिर आहेत, अशी माहिती भाजी व्यापाऱ्यांनी दिली.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article