ओएनजीसीचा नफा 25 टक्क्यांनी घसरला
घसरणीसह नफा 10,273 कोटींच्या घरात : महसूलात मात्र 8 टक्क्यांची वाढ
मुंबई :
ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) ने आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत 10,273 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला आहे. वार्षिक आधारावर पाहता नफा 25 टक्क्यांनी कमी झाला आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीला 13,703 कोटी रुपयांचा नफा झाला होता.
जुलै-सप्टेंबर या तिमाहीत ओएनजीसीचा एकत्रित कामकाजी महसूल 1,58,329 कोटी (1.58 लाख कोटी) होता. त्यात वार्षिक आधारावर 7.25 टक्के वाढ झाली आहे. कंपनीने वर्षापूर्वी याच तिमाहीत (जुलै-सप्टेंबर 2023) रु. 1,47,614 कोटी रुपयांची (1.48 लाख कोटी) कमाई केली होती. वस्तू आणि सेवांच्या विक्रीतून मिळालेल्या रकमेला महसूल म्हणतात.
प्रति शेअर 6 रुपये लाभांश
निकालांसह, ओएनजीसीच्या बोर्डाने भागधारकांना प्रति शेअर 6 रुपये अंतरिम लाभांश देखील मंजूर केला आहे. कंपन्या त्यांच्या भागधारकांना नफ्याचा एक हिस्सा देतात, ज्याला लाभांश म्हणतात.
कंपन्या त्यांचे आर्थिक परिणाम दोन भागांमध्ये प्रसिद्ध करतात - स्वतंत्र आणि एकत्रित. स्टँडअलोन केवळ एका युनिटची आर्थिक कामगिरी दर्शवते. तर, एकत्रित आर्थिक अहवालात, संपूर्ण कंपनीचा अहवाल दिलेला आहे. येथे ओएनजीसीच्या 6 उपकंपन्या, 6 संयुक्त उपक्रम व 3 सहयोगी आहेत. या सर्वांच्या आर्थिक अहवालाला एकत्रित म्हटले जाईल. त्याचवेळी, ओएनजीसीचा वेगळा निकाल स्टँडअलोन म्हटला जाईल.
समभाग वर्षात 31 टक्क्यांनी वाढले
जुलै-सप्टेंबर तिमाही निकालांपूर्वी म्हणजे सोमवार, नोव्हेंबर 11 रोजी 2.02 टक्क्यांनी घसरल्यानंतर ओएनजीसीचे समभाग 257.25 रुपयांवर बंद झाले. गेल्या एका महिन्यात कंपनीचा समभाग 12.07 टक्के आणि गेल्या 6 महिन्यात 3.62 टक्क्यांनी घसरला आहे. तर, गेल्या एका वर्षात 31.38 टक्के आणि यावर्षी 1 जानेवारीपासून 25.27 टक्केचा सकारात्मक परतावा दिला आहे. कंपनीचे बाजारमूल्य 3.23 लाख कोटी रुपये आहे.