Solapur : एक हजार अनुदानित ट्रॅक्टरचे वितरण कृषिमंत्र्यांच्या हस्ते झाले वाटप
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वाटप
सोलापूर : कृषी यांत्रिकीकरण व विविध योजनांच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातीत एक हजार शेतकऱ्यांना मंगळवारी राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते अनुदानीत ट्रॅक्टरच्या चावी प्रदान करण्यात आली. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज येथे आयोजित कार्यक्रमात १०१ नवीन ट्रॅक्टर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते रोतकन्यांना प्रदान करण्यात आले.
यावेळी अक्कलकोट, दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना समावेश होता कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले, तालुका कृषी अधिकारी, कृषी विभागाचे कर्मचारी तसेच ट्रैक्टर कंपनीचे वितरक उपस्थित होते. यावेळी मरणे यांनी फीत कापून कार्यक्रमाचा शुभारंभ केला आणि शेतकयांना ट्रैक्टरच्या चाव्या सुपूर्त केल्या.
कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत २०२५-२६ या वर्षासाठी मंजूर निषीच्या आधारे प्रवम अर्ज, प्रथम प्राधान्य' या तत्त्वानुसार १,९६,०५० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यापैकी १,८९,७५३ अर्ज प्रक्रियेत असून ८२५१ अर्जाना पूर्वसंगती देण्यात आली आहे. तसेच ५५६ लाभाव्यांच्या बैंक खात्यात ७११.०० लाख रुपयांचे अनुदान पेट वर्ग करण्यात आले आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या एकाही शेतकऱ्याला नुकसान भरपाईपासून वंचित ठेवले जाणार नाही. कृषी यांत्रिकीकरण योजनेचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामग्रीचा लाभ देऊन उत्पादन प्रक्रिया सुलभ करणे, मजुरांची टंचाई दूर करणे आणि वेळेची बचत साधणे, शेतकयांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच आमचे यश आहे.
या उपक्रमामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेती क्षेत्रात यांत्रिकीकरणाला नवे बळ मिळणार असून उत्पादनक्षमता वाढण्यास हातभार लागणार आहे. शासनाच्या योजनांचा लाम प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे असेही कृषीमंत्री भरणे यांनी यावेळी सांगितले.