महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

समाजसेवेचा असाही एक मार्ग

06:22 AM Jun 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ऑन लाईन फूड डिलिव्हरी हा अलिकडच्या काळातील प्रचलित शब्द बनला आहे. श्रीमंतांपासून उच्च मध्यमवर्गियांमध्ये मोडणारे अनेकजण हॉटेलात जाऊन खाण्यापेक्षा ऑनलाईन डिलिव्हरी घरी मागवून खातात. त्यामुळे असे खाद्यपदार्थ लोकांच्या घरापर्यंत पोहचविणे हा अनेकांसाठी नवे रोजगारसाधानही बनले आहे.

Advertisement

याच ऑनलाईन फूड डिलिव्हरी व्यवसायाच्या संदर्भात अनेकदा स्वारस्यपूर्ण घटना घडत असतात. नोयडा येथील पंकज कुमार नामक व्यक्तीने आपल्या घराच्या दरवाजावर एक नोटीससारखा संदेश कागदावर लिहून चिकटविला आहे. या संदेशामुळे त्यांना पंचक्रोशीत बरीच प्रसिद्धीही मिळाली असून त्यांचे कौतुक होत आहे. सध्या देशभरात उष्णतेची लाट आहे. नोयडासारख्या ठिकाणी तर या लाटेची तीव्रता अधिकच आहे. अशा स्थितीत फूड डिलिव्हरी करणाऱ्या लोकांना तहान लागणे, पाणी प्यावेसे वाटणे सहज शक्य असते. ही आवश्यकता लक्षात घेऊन पंकज कुमार यांनी अशा व्यक्तींसाठी लिंबूपाण्याची व्यवस्था केली आहे. त्याचसंबंधीचा हा संदेश त्यांनी घराच्या दरवाजावर चिकटविला आहे.

Advertisement

ज्या डिलिव्हरी बॉयला तहान लागली असते त्याने येथे येऊन लिंबूपाणी घ्यावे. लाजण्याचे कारण नाही. केवळ डिलिव्हरी बॉय नव्हे तर कोणत्याही तहानलेल्या व्यक्तीला ही सोय येथे उपलब्ध आहे, असा संदेश या कागदावर आहे. घरातून बाहेर पडून मी समाजसेवा करु शकत नाही. पण अशा मार्गाने माझा थोडा उपयोग समाजासाठी होत असेल तर त्यात मला आनंद आहे, कुमार यांचे म्हणणे आहे. त्यांनी उपलब्ध करुन दिलेल्या या सोयीचा लाभ अनेकजण घेत आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article